शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाडी वेळापत्रकात बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 21:26 IST

अर्जुनी मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. जिल्हा मुख्यालयाशी म.रा. परिवहन महामंडळाशी थेट नाड न जुळलेला हा एकमेव तालुका आहे.

ठळक मुद्देअर्जुनी मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. जिल्हा मुख्यालयाशी म.रा. परिवहन महामंडळाशी थेट नाड न जुळलेला हा एकमेव तालुका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : अर्जुनी मोरगाव तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. जिल्हा मुख्यालयाशी म.रा. परिवहन महामंडळाशी थेट नाड न जुळलेला हा एकमेव तालुका आहे. तालुक्याशी रेल्वेमार्ग जुडलेला आहे. मात्र रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कार्यालयीन कामकाजासंदर्भात जुळत नसल्याने जनतेची गैरसोय होत आहे. या वेळापत्रकात बदल करण्याची जनतेची मागणी आहे.गोंदिया-बल्लारशा या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले. (५८८०२) ही गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर ट्रेन गोंदिया रेल्वे स्थानकावरुन सकाळी ७.३० वाजता सुटत होती. मात्र ही गाडी डिझेल इंजिनऐवजी विद्युतीकरणावर गोंदिया ते नागभिडपर्यंत परिवर्तीत झाली. नागभिड येथे पुन्हा डिझेल इंजिन लावला जातो. यासाठी अर्धातास विलंब होत असल्याने गोंदिया येथून सकाळी ७.३० वाजता सुटणारी रेल्वेगाडी ७ वाजता करण्यात आल्याचे समजते. विद्युतीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेल्या बदलामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही ट्रेन पूर्ववत सकाळी ७.३० वाजता गोंदिया रेल्वे स्थानकावरुन सोडण्याची मागणी आहे.बल्लारशा येथून गोंदियाकडे परतीच्यावेळी (५८८०१) बल्लारशा-गोंदिया ही गाडी नेहमीच उशीरा सोडली जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. ही गाडी बल्लारशाऐवजी चांदाफोर्ट स्थानकावरुन सोडल्यास वेळ नियंत्रित केली जाऊ शकते. ही गाडी गोंदिया स्थानकाच्या आऊटरवर सुमारे तासभर थांबते. याची रेल्वे पोलिसांकडे तक्रार झाली आहे. या रेल्वे गाडीचे हिरडामाली स्थानकावरुन सायंकाळी ७.१६ वाजता प्रस्थान वेळ आहे व गोंदिया येथे पोहोचण्याची वेळ रात्री ८.३० वाजताची आहे. हिरडामाली ते गोंदिया हे केवळ १२ किमीचे अंतर कापण्यासाठी १ तास १४ मिनिटांचा कालावधी कसा? हा प्रश्न अन्नुत्तरित आहे. बल्लारशा-गोंदिया (५८८०३) रेल्वेगाडी बल्लारशा येथून सकाळी ५.३० वाजता सुटते. ही गाडी साधारणत: गोंदिया येथे ११.३० वाजता पोहोचते.कार्यालयीन कामकाजासाठी जाणारे लोक तसेच कर्मचारी, विद्यार्थी व व्यापाºयांना ही वेळ गैरसोयीची ठरते. याऐवजी १०.३० वाजता गोंदिया येथे पोहोचल्यास सर्वांना सोईचे होईल. या वेळेवर ही गाडी पोहोचल्यास बालाघाटकडे जाणाºया प्रवाशांना गोंदिया रेल्वे स्थानकावरुन उपलब्ध होऊ शकते. या सर्व बाबींकडे लोकप्रतिनिधी व रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी रेल्वे प्रवाशी, विद्यार्थी, व्यापारी व दैनंदिन ये-जा करणाºया कर्मचाºयांनी केली आहे.