शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या नुकसानभरपाईचा मापदंडच बदलवावा

By admin | Updated: June 25, 2015 00:44 IST

खरीप किंवा रब्बी उत्पादनापेक्षा बागायती शेती फायद्याची आहे.

बागायतदारांची भावना : भरपाई मिळणे कठीणआमगाव : खरीप किंवा रब्बी उत्पादनापेक्षा बागायती शेती फायद्याची आहे. मात्र यावर्षी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे बागायती शेतीमधील पिकांच्या नुकसानभरपाईचा मापदंड अयोग्य असल्याने बागायतदार शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.वळद येथील बागायतदार शेतकरी किशोर रहांगडाले यांच्या १४ एकर शेतात बागायती शेतीमधील आंब्याचे, फणसाचे व चिकूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागातर्फे बागायत शेतीच्या नुकसान भरपाईचा आढावा घेण्याकरिता सध्या कार्यरत तहसीलदार, खंडविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी स्वत: बागायत शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहणी केली, मात्र १२ हजार रुपये हेक्टरी नुकसानभरपाई देण्यात आली. या अगोदर दोन वर्षापूर्वी बागायती शेतीच्या नुकसानभरपाई हेक्टर २५ हजार रुपये देण्यात आले होते. ही पध्दत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागू आहे. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांची बागायत शेतीचे जेवढे नुकसान झाले तेवढे मिळत नाही. यावर्षी सुध्दा मागील शासनाच्या निकषाप्रमाणे हेक्टरी २५ हजार देणे गरजेचे होते, अशी भावना रहांगडाले यांनी व्यक्त केली. आता सततच्या पाण्यामुळे व सोसायट्याच्या वाऱ्यामुळे तपासणीनंतर सुध्दा आंबे, चिकूचे खूप नुकसान झाले आहे. त्याचा मोबदला किंवा तपासणी करण्यात आली नाही. जवळपास एक महिन्यात आंबे व चिकूचे एक ते दोन लाखाचे नुकसान झाल्याचे रहांगडाले यांनी सांगितले.तसेच आता विविध जातीचे आंब्याचे रोपटे विक्रीस तयार असून त्यावर सुध्दा परिणाम झाला आहे. पाणी आंब्यावर व चिकूवर गेल्याने योग्य भाव मिळाला नाही. अशीच अवस्था संपूर्ण बागायतदार शेतकऱ्यांची आहे. नुकसान भरपाईचा मापदंड योग्यरित्या झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यात व्यापक रोष असल्याची प्रतिक्रिया शेतीनिष्ठ शेतकरी किशोर रहांगडाले यांनी व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)