शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत चलन तुटवडा

By admin | Updated: May 14, 2017 00:27 IST

स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या आठ दिवसांपासून चलन तुटवडा असल्यामुळे नोकरदार कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

वेतनापासून वंचित : चलन पुरविण्याची खातेधारकांची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क केशोरी : स्थानिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या आठ दिवसांपासून चलन तुटवडा असल्यामुळे नोकरदार कर्मचाऱ्यांना वेतनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. सध्या सुरू असलेल्या लग्न सराईचा खर्च कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाने संबंधित बँक शाखेला चलन पुलरवठा करुन नियमितपणे वेतन कर्मचाऱ्यांना देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे. येथे दि गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-आॅप. बँकेची एकमेव शाखा असल्यामुळे या परिसरातील अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक शाळांतील कर्मचाऱ्यांचे वेतनाचे खाते या बँक शाखेत असून यांचे मार्फतच वेतन करण्याची प्रचलित पद्धत आहे. ज्या दिवशी वेतन बँकेत जमा होतात त्याच दिवशी संबंधित कर्मचाऱ्यांना वेतन अदा करणे आवश्यक असताना येथील बँक व्यवस्थापक चलन तुटवड्याची सबब सांगून वेतनापोटी फक्त दोन हजार रुपयांचा विड्राल देवून मोकळा होत आहे. कर्मचाऱ्यांचा पगार प्रत्येकी ५० ते ६० हजार रुपयापर्यंत असतो आणि त्यांना सदर बँकेतून फक्त दोन हजार रुपये मिळत असल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी आपले दैनंदिन खर्चाचे व्यवहार आणि लग्न सराईचा खर्च कुठून करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याच बरोबर आरटीजीएसमध्ये रक्कम ट्रॉन्स्फर करणे सुद्धा बंद असल्यामुळे अनेक कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. जिल्हा बँक प्रशासनाने संबंधित बँक व्यवस्थापकाला कोणतेही आदेश नसताना आरटीजीएस ट्रॉन्सफर रक्कम करणे गेल्या तीन-चार दिवसापासून बंद केले आहेत. याकडे जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाने याकडे विशेष लक्ष देवून येथील बँक शाखेत चलन पुरवठा करुन आरटीजीएस करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी खातेधारकांनी केली आहे.