शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचा निधी रखडला,बांधकाम अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST

सालेकसा : नगर पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गावांतील नागरिकांना घरकुल मिळाल्याने ते आनंदी होते.उधार उसनवार करून त्यांनी साहित्य आणले, बांधकाम ...

सालेकसा : नगर पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गावांतील नागरिकांना घरकुल मिळाल्याने ते आनंदी होते.उधार उसनवार करून त्यांनी साहित्य आणले, बांधकाम केले. राज्य शासनाने आपला हिस्सा लाभार्थ्यांच्या खात्यात टाकला. मात्र केंद्र शासनानेच पैसे दिले नाही. त्यामुळे आता लाभार्थी संतापले आहेत. सावकारांकडून पैसे आणून बांधकाम केले. आता ते सावकार पैशांकरिता तगादा लावत असल्याने लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१ पर्यंत सर्वांना हक्काचे घर बांधून देण्याची योजना आखली. या योजनेंतर्गत राज्य आणि केंद्राच्या हिस्स्यातून निधी देण्यात येतो. ज्या लाभार्थ्यांची नावे घरकुल बांधकामाच्या यादीत मंजूर झाली. त्या लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आज, ना उद्या निधी येईल या आशेने त्यांनी आपले राहते घर तोडून बांधकाम सुरू केले. उधार-उसनवारी करून साहित्य आणले. राज्य शासनाने आपला हिस्सा लाभार्थ्यांच्या खात्यावर टाकला. मात्र केंद्र शासनाने अद्यापही पैसा दिला नाही. त्यामुळे अनेकांचे घरकुल अपूर्ण पडले आहेत. कित्येकांचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यांच्याकडे दुकानदार आणि सावकार पैशांकरिता तगादा लावत आहेत. सालेकसा नगर पंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या आमगाव खुर्द, हलबीटोला, जांभळी, सालेकसा आणि बाकलसर्रा येथील ४०२ लाभार्थी अद्यापही केंद्र शासनाकडून येणाऱ्या दीड लाख रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले. त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून उधारी कशी फेडायची असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आपल्या खात्यात पैसे जमा झाले काय? याची खातरजमा करण्याकरिता लाभार्थी दररोज नगर पंचायतीत जाऊन विचारणा करीत आहेत. मात्र गेल्या वर्षभरापासून पैसेच आले नाही, हेच उत्तर त्यांच्या कानावर पडत आहे. यासंदर्भात नगर पंचायतीचे अध्यक्ष वीरेंद्र उईके यांच्याशी संपर्क केला असता लवकरच निधी प्राप्त होणार असल्याचे सांगितले.

......

उघड्यावर राहण्याची वेळ

घरकुल मंजूर होण्यापूर्वी लाभार्थ्यांकडे झोपडीवजा घर होते. घरकुल मंजूर झाल्याने त्यांनी आपल्याला पक्के घर मिळेल, या आशेने आपले घर पाडून त्याठिकाणी बांधकाम सुरू केले. मात्र वर्ष लोटून देखील निधी आला नसल्याने घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे डोक्यावरचे छतही गेले असून उन्हाळ्यात त्यांना बांधकामाच्या बाजूला ताणलेल्या तंबूमध्येच आसरा घेण्याची वेळ आली आहे.