शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राचे गोदाम ‘फुल्ल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आमगाव : येथील धान खरेदी केंद्राचे गोदाम ‘फुल्ल’ झाल्याने शेतकऱ्यांना धान स्थानिक व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. ...

ठळक मुद्देशेतकरी संकटात : स्थानिक व्यापारी मालामाल

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : येथील धान खरेदी केंद्राचे गोदाम ‘फुल्ल’ झाल्याने शेतकऱ्यांना धान स्थानिक व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. त्यामुळे शासनाची फसवेगीरी समोर येत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.तालुक्याला धान्याचे कोठार म्हटले जाते. येथील बहुतेक नागरीक शेत पिकावर अवलंबून आहेत. सत्ताधाऱ्याकडून कारखाने किंवा रोजगाराचे साधन उपलब्ध करुन न दिल्याने येथील युवा पीढी कसी बसी शेतातील विविध पीक घेवून आपली उपजिविका चालवितात. पण शासनाकडून धान खरेदी केंद्राच्या नावावर शेतकऱ्यांशी थट्टा करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र कालीमाटी अंतर्गत घाट्टेमनी, गिरोला, टाकरी, टेकरी, कातुर्ली, मोहगाव, भोसा, पोकरटोला, करंजी, कालीमाटी, कट्टीपार, सुपलीपार, मुंडीपार, सितेपार, रामजीटोला, मरारटोला, ननसरी, गोसाईटोला, डोंगरगाव, बंजारीटोला, नंगपुरा, बोदा, आमगाव केंद्रातील माल्ही, महारीटोला, बनगाव, रिसामा, पदमपूर, पिपरटोला, सावंगी, बोरकन्हार, अंजोरा, वळद, भालीटोला, कवळी, सावंगी, चिचटोला, वाघडोंगरी, किकरीपार, कटंगीटोला, बाम्हणी, धामनगाव, नवेगाव, जांभुटोला, भजेपार आदी गावातील शेतकºयांना धान विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांना अल्पदरात विक्री करावा लागत आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे केंद्रीय गोदाम तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीने भाड्याने घेतले आहे. पण सदर गोदाम धानाने भरले आहे.त्या धानाची उचल जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना करायची असते पण १७ नोव्हेंबरपासून उचल झाली नाही. गोदामात २ हजार ५०० पोती म्हणजेच सुमारे १३०० क्विंटल धान आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांचे धान उघड्यावर पडलेले असून खरेदी बंद करण्यात आली आहे.कारण खरेदी-विक्री सोसायटीला गावात भाड्यावर गोदाम देण्यास कुणीही तयार नाही. आमगावात गोदाम उपलब्ध आहेत, पण भाड्याने देण्यास नागरिक किंवा व्यापारी इच्छुक नाही.यात मात्र शेतकºयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून त्वरित केंद्र सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार नसून ती फसवणूक करीत आहे. हमी भावाच्या नावावार व्यापारीकरण सुरु आहे. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारी वर्ग धान्य विकत असल्याने घाम काढणारा शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहणार. शासनाने शेतकºयांचे हित पाहून केंद्र त्वरित सुरु करावे.-सुरेश हर्षे, जि.प. सदस्य-----------------------खरेदी विक्री समितीच्यावतीने जिल्हा फेडरेशनकडे लेखी कळविले आहे. त्यांनी गोदामाची व्यवस्था करण्यास सुचविले आहे. पण आम्ही वास्तविकता कळविलेली आहे व मालाची उचल करण्यास विनंती केली आहे.-चौरागडे, समन्वयक, धान खरेदी केंद्र, आमगाव