शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांची सांगता

By admin | Updated: September 3, 2016 00:02 IST

तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोरगाव-बाजार येथे शासकीय व अनुदानित

विविध सांघिक खेळ : ११ शाळांतील ५८३ खेळाडूंचा सहभागदेवरी : तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोरगाव-बाजार येथे शासकीय व अनुदानित आश्रम शाळांच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा २६ ते २९ आॅगस्ट या कालावधीत पार पडल्यात. यात शासकीय आश्रमशाळा बोरगाव-बाजार, पालांदूर, कडीकसा, ककोडी व अनुदानित आश्रमशाळा भागी, कोसंबी, शेरपार, बुधेवाडा, म्हैसुली, येरंडी व एकलव्य रेशिडेंसियल पब्लिक स्कूल बोरगाव अशा एकूण ११ शाळांतील ५८३ खेळाडू सहभागी झाले होते.उद्घाटन सहायक प्रकल्प अधिकारी रघुते यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी विजय टेंभुर्णीकर, शिक्षण विस्तार अधिकारी क्रीडा समन्वयक प्रेमलाल कोरोडे, गटसमन्वयक तीतराम, प्राचार्य जगदीश बारसागडे, क्रीडा शिक्षकवर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.यानंतर सांघिक कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल तसेच मैदानी १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, ६०० मीटर, ८०० मीटर, १५०० मीटर, तीन हजार मीटर व पाच हजार मीटर धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, भाला फेक, थाली फेक आदी क्रीडा पार पडल्या.शेवटच्या दिवशी प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व जि.प. सदस्य उषा शहारे, ठाणेदार तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी स्पर्धेचे प्रथम बक्षीस अनुदानित आश्रमशाळा बुधेवाडा, द्वितीय क्रमांक अनुदानित आश्रमशाळा कोसबी, खो-खोमध्ये प्रथम बक्षीस बुधेवाडा व द्वितीय बक्षीस अनुदानित आश्रम शाळा म्हैसुली, व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक बुधेवाडा तर द्वितीय क्रमांक पालांदूरला मिळाला. १४ वर्षे मुलींच्या गटामध्ये कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक म्हैसुली व द्वितीय क्रमांक बुधेवाडा, खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक बुधेवाडा व द्वितीय क्रमांक पालांदूर, व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पालांदूर तर द्वितीय क्रमांक बुधेवाडाला मिळाले.१७ वर्षे वयोगटामध्ये कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक म्हैसुली व द्वितीय क्रमांक शेरपार, खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक बुधेवाडा व द्वितीय क्रमांक म्हैसुली, व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पालांदूर व द्वितीय क्रमांक ककोडी शाळेला मिळाले. मुलींच्या १७ वर्षे वयोगटामध्ये कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक म्हैसुली व द्वितीय क्रमांक बोरगाव-बाजार, खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पालांदूर व द्वितीय क्रमांक बुधेवाडा, व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक बोरगाव-बाजार व द्वितीय क्रमांक बुधेवाडा शाळेला मिळाले.मुलांच्या १९ वर्षे वयोगटामध्ये कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक कडीकसा व द्वितीय क्रमांक कडीकसा, खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक कडीकसा व द्वितीय क्रमांक येरंडी, व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक कडीकसा व द्वितीय क्रमांक येरंडी शाळेला मिळाले. तर मुलींच्या १९ वर्षे वयोगटामध्ये कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक बोरगाव-बाजार व द्वितीय क्रमांक येरंडी, खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक बोरगाव-बाजार व द्वितीय क्रमांक कडीकसा, व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक बोरगाव-बाजार व द्वितीय क्रमांक कडीकसा शाळेने प्राप्त केले. यात केंद्रस्तरीय विजेता संघ शासकीय आश्रमशाळा कडीकसा व उपविजेता संघ शासकीय आश्रमशाळा बोरगाव-बाजार ठरला. सदर क्रीडा स्पर्धांसाठी केंद्र समन्वयक कोरोडे, प्राचार्य जगदीश बारसागडे, क्रीडा शिक्षक नेताजी गावड, मोहन मारबते, भूपेश आरीकर, इतर शिक्षकवृंद, शिक्षकेतर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)