शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:35 IST

जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (दि.२९) शेवटचा दिवस असल्याने आॅनलाईन केंद्र, ...

ठळक मुद्देलिंक फेलची समस्या : अनेक उमेदवार वंचित राहण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतींची निवडणूक येत्या १६ आॅॅक्टोबरला होऊ घातली आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार (दि.२९) शेवटचा दिवस असल्याने आॅनलाईन केंद्र, तहसील आणि उपविभागीय कार्यालयात नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी उसळल्याचे चित्र होते.जिल्ह्यातील ३४७ सरपंच आणि २ हजार ९३९ सदस्य पदांसाठी १६ आॅक्टोबरला निवडणूक होणार आहे. यासाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २२ आॅक्टोबरपासून सुरूवात झाली. निवडणूक आयोगाने यावर्षीपासून नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांची चांगलीच अडचण होत आहे. त्यामुळेच सुरूवातीच्या पाच सहा दिवसांत केवळ २१० नामाकंन अर्ज दाखल झाले होते. गुरूवारपासून नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची केंद्रावर गर्दी वाढत असल्याचे चित्र होते.गुरूवारी सर्व केंद्रांवर सरपंच पदासाठी २२७ तर सदस्य पदासाठी ९७० नामाकंन अर्ज दाखल झाले होते. तर शुक्रवारी सकाळी १० वाजतापासूनच जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी गर्दी केली होती. नामाकंन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. त्यामुळे नेमक्या किती उमेदवारांनी शुक्रवारी नामाकंन अर्ज दाखल केले याची माहिती कळू शकली नाही.अनेक उमेदवार वंचित राहण्याची शक्यताग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस होता. भारनियमन, लिंक फेलमुळे अर्ज भरण्यास फार विलंब झाला. नामाकंन अर्ज दाखल करणाºया उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. मात्र लिंक फेलच्या समस्येमुळे अनेक उमेदवार नामाकंन अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहिल्याची शक्यता वर्तविली जात आहे.ग्रामीण भागात भारनियमन सुरुचजिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू आहे. याचा फटका आॅनलाईन नामाकंन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला बसला. शुुक्रवार नामाकंन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र दुपारी ३ ते सायंकाळी ६ या कालावधित भारनियमन असल्याने नामाकंन अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या उमेदवारांना त्याचा फटका बसला. निवडणुकीच्या कालावधित भारनियमन बंद करण्याच्या मागणीकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले.