शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कुंभारटोली येथे सामाजिक न्याय दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:07 IST

भारत सरकारच्या ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत तहसील कार्यालय व येथील नगर परिषदेच्या संयुक्तवतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी तालुक्यातील कुंभारटोली येथील समाज भवनात सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : भारत सरकारच्या ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत तहसील कार्यालय व येथील नगर परिषदेच्या संयुक्तवतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी तालुक्यातील कुंभारटोली येथील समाज भवनात सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला.उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार साहेबराव राठोड, नायब तहसीलदार शिशुपाल पवार, एस.एम. नागपुरे, पं.स. उपसभापती जयप्रकाश शिवणकर, प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी एल.एल. कुटे, तालुका कृषी अधिकारी एल.एच. बन्सोड, कृषी अधिकारी सी.डब्ल्यू. वंजारे, सहाय्यक वनक्षेत्राधिकारी लेखराम भुते, पोलीस पाटील नर्मदा चुटे, संजय निराधार समिती अध्यक्ष सरोज कोसरकर, माजी सरपंच सुनंदा येरणे, माजी उपसरपंच निखील मेश्राम, तंटामुक्त समिती अध्यक्ष आशिक वैद्य, वनपाल समिती अध्यक्ष अशोक बोकडे, मंडळ अधिकारी कठाणे, तलाठी पटले, एस.आर. ब्राम्हणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.या अभियानांतर्गत तालुक्यातील कुंभारटोली, तिरोडा तालुक्यातील घोगरा व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील येरंडी या तीन गावांची निवड करण्यात आली असून ‘सबका साथ, सबका गाव, सबका विकास’ या विशेष मोहिमेत प्रधानमंत्री उजाला योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना व मिशन इंद्रधनुष्य अशा सात योजनांचा समावेश आहे.हे अभियान १४ एप्रिल ते ५ मे या कालावधीत सामाजिक न्याय दिवस, स्वच्छ भारत दिवस, उज्वला दिवस, राष्ट्रीय पंचायत राज दिवस, ग्राम स्वराज्य दिवस, आयुष्यमान भारत दिवस, किसान कल्याण दिवस, आजिवीका दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. उद्घाटनप्रसंगी सदर योजनांचा कुंभारटोली येथील नागरिकांनी लाभ घ्यावा असे अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी कळविले. प्रास्ताविक तहसीलदार राठोड यांनी मांडले. संचालन सहाय्यक गट विकास अधिकारी कुटे यांनी केले. आभार नायब तहसीलदार पवार यांनी मानले. यावेळी गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.