शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भजे, समोसे, पकोडे विकून साजरा केला बेरोजगार दिवस ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:31 IST

गोंदिया : केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठमोठी आश्वासने दिली होती, तर दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना राेजगार ...

गोंदिया : केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठमोठी आश्वासने दिली होती, तर दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना राेजगार देण्याचे आश्वासन दिले होते; पण मागील तीन वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली नाही. त्यामुळे बेरोजगारीच्या समस्येत वाढ झाली आहे. याचाच निषेध नोंदवीत जिल्हा युवक काँग्रेस आणि एनएसयूआयने शुक्रवारी (दि.१७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी भजे, समोसे, पकोडे विकून बेरोजगार दिवस साजरा केला.

जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहरातील नेहरू चौक व जयस्तंभ चौक येथे दुपारी १२ वाजता पकोडे विकून अनोखे आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी हातगाडीवरून भजे, समाेसे, पकोडे आणि चहा विक्रीचे प्रतीकात्मक दुकान लावून ग्राहकांना त्याची विक्री केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील समस्त बेरोजगारांची दिशाभूल केली, म्हणून त्यांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा करीत असल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष आलोक मोहंती यांनी सांगितले.

जिल्हा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्या या अनोख्या आंदोलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.

.............

डिग्री लावून केली

पकोड्यांची विक्री

अनेक युवकांकडे मेडिकल, इंजिनिअरिंग, शिक्षणशास्त्र यासह अनेक विषयांतील डिग्री आहेत. मात्र, त्यांना रोजगार मिळाला नसल्याने रोजगार हमीच्या कामावर जाऊन उदरनिर्वाह भागवावा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डिग्री लावून चहा व समोशाची विक्री केली.

.......

हे झाले आंदोलनात सहभागी

यावेळी आ. सहर्षराम कोरोटे, एनएसयूआई अध्यक्ष हरीश तुळसकर, गप्पू गुप्ता, शहरध्यक्ष जहीर अहमद, युवक काँग्रेस प्रदेश सचिव रुचित देवे, शहर महासचिव दलेश नागदवने, अमर राऊत, बंटी कोठारी, मनीष चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष मजहर खान, विधानसभा अध्यक्ष बाबा बागडे, शहराध्यक्ष रवी चौरसिया, दीपेश अरोरा, राजू गिल, उपाध्यक्ष कीर्ती येरणे, एनएसयूआई शहराध्यक्ष रुकनेज शेख, तालुकाध्यक्ष शैलेश बिसेन, वारीस भगत, कृष्णा बिभार, अनिल रंगिरे, मंथन नंदेश्वर, अमित मरुन्बान, विक्की रहांगडाले, शाहरुख सोलंकी, अमन रोगाटिया सहभागी झाले होते.