शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

४० प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सीसीटीव्हीचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 21:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सरकारी आरोग्य केंद्रात वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकरणावर करडी नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात ३२० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राज्यात हा पहिलाच प्रयोग आहे.राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. या निर्णयाने आरोग्य कर्मचाºयांच्या सुरक्षेसह गुन्हेगारीवर काही प्रमाणात अंकुश ...

ठळक मुद्दे पहिला प्रयोग जिल्ह्यात : दांडी मारणाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीनही लागले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सरकारी आरोग्य केंद्रात वाढत्या गुन्हेगारीच्या प्रकरणावर करडी नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात ३२० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राज्यात हा पहिलाच प्रयोग आहे.राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. या निर्णयाने आरोग्य कर्मचाºयांच्या सुरक्षेसह गुन्हेगारीवर काही प्रमाणात अंकुश लागणार आहे. गत काही वर्षात सरकारी आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाºयांसोबत मारहाण व अन्य गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनावर अंकुश लावण्यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे जिल्ह्यातील संपूर्ण ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. बहुतांश ुठकाणी कॅमेरे लावले तर काही ठिकाणी लावण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी लिी आहे.गोंदिया तालुक्यातील भानपूर, एकोडी, दासगाव, दवनीवाडा, मोरवाही व खमारी, तिरोडा तालुक्यातील इंदोरा, वडेगाव, मुंडीकोटा, सुकडी डाक, गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा, चोपा, सोनी, कुºहाडी, तिल्ली मोहगाव, आमगाव तालुक्यातील बनगाव, ठाणा, कालीमाटी, तिगाव, सालेकसा तालुक्यातील सातगाव, कावराबांध, दर्रेकसा, बिजेपार, देवरी तालुक्यातील मुल्ला, फुटाना, ककोडी, घोनाडी, सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा, शेंडा, खोडशिवनी, पांढरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कोरंभीटोला, महागाव, गोठणगाव, चान्ना/बाक्टी, केशोरी, धाबेटेकडी, या सर्व ४० प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ असे एकूण ८-८ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहे.सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य विभाग व संबंधित कंपनीद्वारे निरीक्षण करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याने गुन्हेगारीवर आळा बसेल. यामुळे तेथील कार्यरत कर्मचाºयांची सुरक्षा होणार आहे.हजेरीसाठी बायोमेट्रिक मशीनप्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत अनेक कर्मचारी व अधिकारी मुख्यालयात न राहता दुरुन अप-डाऊन करतात. वेळेवर ते हजर नसल्याने रुग्णांचे प्राण देखील जाऊ शकते. कर्मचाºयांच्या अनुपस्थितीतवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशासनाद्वारे बामोमेट्रिक मशीन लावण्ययात आली आहे. यामुळे सर्वांना वेळेवर हजर राहणे अनिवार्य आहे. तसेच वेळेपूर्वीच कर्मचारी घरी जाऊ शकणार नाही.

टॅग्स :cctvसीसीटीव्ही