शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमवर केवळ सीसीटीव्हीचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

कधीही या व पैसा काढा या सुविधेमुळे लोकांना आता बँकेत जाण्याची गरज पडत नाही. कित्येकदा बँकेतून पैसे काढल्यानंतर बॅग हिसकावून नेणे, यासारख्या घटना घडल्या आहेत. अशात एटीएममधून पैसा काढण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र आता एटीएममधून पैसे काढणेही धोकादायक ठरत असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना एटीएमदेखील सुरक्षित नसल्याची बाब उघडकीस आली आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गॅस कटरने एटीएम फोडल्याच्या अनेक घटना घडल्या असतानाही एटीएमच्या सुरक्षा वाऱ्यावर आहेत. न्यायालयाने सर्व एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश बँका व्यवस्थापनाला दिले होते. मात्र या आदेशाची सुद्धा सर्रासपणे पायमल्ली केली जात आहे. गोंदिया शहर व जिल्ह्यातील बहुतांश एटीएमवर केवळ सीसीटीव्हीचाच वॉच असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. गोंदिया शहरात प्रमुख २० बँकांच्या शाखा व त्यांचे एटीएम आहेत. जिल्ह्यातील अन्य शहर व ग्रामीण भागांतही या बँकांनी ग्राहकांसाठी एटीएमची सुविधा दिली आहे. कधीही या व पैसा काढा या सुविधेमुळे लोकांना आता बँकेत जाण्याची गरज पडत नाही. कित्येकदा बँकेतून पैसे काढल्यानंतर बॅग हिसकावून नेणे, यासारख्या घटना घडल्या आहेत. अशात एटीएममधून पैसा काढण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. मात्र आता एटीएममधून पैसे काढणेही धोकादायक ठरत असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असताना एटीएमदेखील सुरक्षित नसल्याची बाब उघडकीस आली आहे.  शहरातील बहुतांश बँकांचे एटीएम केवळ सीसीटीव्हीच्या निगराणीत आहेत.एटीएम शहरातील मुख्य परिसरात असल्याने त्यांना फोडण्यासारख्या घटना घडणे तेवढेही शक्य नसल्याचे दिसले. मात्र बँक ऑफ महाराष्ट्रचे दुर्गा चौकातील दुर्गा मंदिराच्या बाजूला असलेले एटीएम सुरक्षेच्या निकषांत बसत नसल्याचे दिसले. येथे गार्ड नसल्याने कुणीही या मशीन वापरा व निघून जा असे चित्र दिसले. या शिवाय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेलगत असलेले एटीएम सुरक्षारक्षकाविनाच दिसले. बाजारातील ॲक्सिस बँक, इलाहाबाद बँक यांचेही एटीएम दिवसाच काय रात्रीलाही सुरक्षारक्षकाविना असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. 

अन्य बँकांना सीसीटीव्हीचाच आधार - जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयटीआयसीआय व ॲक्सिस बँकेच्या एटीएमला सीसीटीव्हीचाच आधार आहे. विशेष म्हणजे, बँकेच्या व्यवस्थापकांशी सुरक्षेबाबत विचारणा केली असता त्यांनी सीसीटीव्ही लागलेले असल्याचे सांगीतले. विशेष म्हणजे, एटीएम मशीन्सची छेडछाड करण्याचे प्रकार घडत असतानाच एटीएममध्ये गुन्हेगारीचे प्रकारही घडत आहेत. अशात एटीएम व ग्राहक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही हा एकमेव पर्याय किती सुरक्षित आहे हा मात्र प्रश्न सर्वांना पडत आहे.

 

टॅग्स :atmएटीएम