शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...कोरोनाची बारा हजारी वाटचाल झाली सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 05:00 IST

२३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु झाल्याने शिक्षकांना कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कोरोना चाचणी केंद्रावर सर्वाधिक शिक्षकांचे स्वॅब नमुने तपासणी केले जात आहे. त्यामुळे सुध्दा रुग्ण संख्येत थोडी वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४० शिक्षक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. बुधवारी जिल्ह्यात १३३ कोरोना बाधित आढळले. यात सर्वाधिक ७७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत.

ठळक मुद्दे१३३ नवीन रुग्णांची नोंद : १८ बाधितांनी केली मात, मृत्यू दर १.१९ टक्के

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दीड महिन्यात खालावलेला कोरोना बाधितांचा आलेख मागील आठवडाभरापासून वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या तीन आकड्यात वाढत असून बुधवारी (दि.२५) जिल्ह्यात १३३ नवीन कोरोना बाधितांची भर पडली. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या एकूण कोरोना बाधितांचा आकडा ११९०९ वर पोहचला असून कोरोनाची बारा हजारी वाटचाल सुरु झाल्याने जिल्हावासीयांना वेळीच सावध होण्याची गरज आहे. २३ नोव्हेंबरपासून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरु झाल्याने शिक्षकांना कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या कोरोना चाचणी केंद्रावर सर्वाधिक शिक्षकांचे स्वॅब नमुने तपासणी केले जात आहे. त्यामुळे सुध्दा रुग्ण संख्येत थोडी वाढ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४० शिक्षक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. बुधवारी जिल्ह्यात १३३ कोरोना बाधित आढळले. यात सर्वाधिक ७७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा ६, गोरेगाव ४, आमगाव १२, सालेकसा १, देवरी २, सडक अर्जुनी ८, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील २३ कोरोना बाधितांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४८१०१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले आहे. त्यापैकी ३५५५४ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रुग्णांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत ४७९१४ स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४२९२१ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११९०९ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १०७३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात १०१९ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण असून २१६४ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे. तर १५४ कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 

रुग्ण बरे होण्याचा दर ८९.०५ टक्के जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.०५ टक्के असल्याने जिल्हावासीयांना थोडा दिलासा सुध्दा मिळाला आहे. रुग्ण वाढीचा डब्लिंग रेट १२१ दिवसावर गेला आहे. तर मृत्यू दर १.१९ टक्के आहे.  

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या