शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

परराज्यातून आणलेल्या दारूचा साठा पकडला

By admin | Updated: June 8, 2016 01:34 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून अवैधपणे चोरट्या मार्गाने गोंदियाच्या हद्दीत

गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून अवैधपणे चोरट्या मार्गाने गोंदियाच्या हद्दीत विक्रीसाठी आणलेला हलक्या मद्याचा साठा जप्त केला आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक नितीन धार्मिक व त्यांच्या चमूने ही कारवाई केली.महाराष्ट्रात मद्यावर कर असल्यामुळे लगतच्या मध्यप्रदेश छत्तीसगड राज्यातील कमी दर्जाची दारू येथे आणून चढ्या दराने विक्री करण्याचा गोरखधंदा काही प्रमाणात होतो. तो हाणून पाडण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवली. यादरम्यान सोमवारी (दि.६) सायंकाळी ७.३० वाजता अधीक्षक धार्मिक यांच्या नेतृत्वात पथकाने फुलचूरमधील सेल्स टॅक्स कॉलनीत किरायाने राहणाऱ्या आरोपीच्या घरी धाड टाकली. या यशस्वी छाप्यात मध्यप्रदेश निर्मित सिल्वर जेट कंपनीच्या ७५० मिलीच्या प्लास्टिकच्या बाटल्यांमधील मद्य महाराष्ट्रातील इम्पेरियल ब्लू या कंपनीच्या १८० मिलीच्या १३६ बाटल्या व मॅकडॉल नंबर १ व्हिस्कीच्या १८० मिलीच्या २३७ बाटल्यांमध्ये सीलबंद करून ठेवल्याचे आढळून आले. तसेच इम्पेरियल ब्लू या ब्रॅन्डच्या ३७० कॅप (झाकणे) व मॅकडॉल नंबर १ व्हिस्की या ब्रॅन्डचे ४८५ झाकणे मिळून आलेत. यावरून या ठिकाणी बनावट विदेशी ब्रॅन्डचे मद्य तयार केले जात असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणातील आरोपी नितीन उर्फ निर्मल जयपाल होतचंदानी, रा.गोरेगाव हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक भगत, सहा.दु. निरीक्षक हुमे, जवान पागोटे व वाहनचालक सोनबर्से यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)