शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

आमगावकरांच्या घशाला पडली कोरड

By admin | Updated: March 26, 2016 01:41 IST

आमगाव तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आमगाव शहरात प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेवरील ...

पाणी पुरवठा बंद : पर्यायी व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्षआमगाव : आमगाव तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आमगाव शहरात प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेवरील पर्यायी सुविधांकडे दुर्लक्ष केल्याने उन्हाळ्याच्या तोंडावरच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नदी पात्रातील पाणी संपल्याने आमगाव येथील पाणी पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे चार दिवसांपासून आमगावकरांच्या घशाला कोरड पडली आहे.आमगाव ग्रामपंचायतअंतर्गत नागरिकांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता ही योजना कालबाह्य ठरली होती. त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना शासनाकडून मंज़ुर करण्यात आली. परंतु वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करताना पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या स्त्रोताकडे योग्य लक्ष देण्यात आले नाही. प्रशासनाने वाढीव पाणी पुरवठा योजना घाईघाईने कार्यान्वित करुन घेतली. आमगाव येथे नदी पात्रातून असलेल्या सिंचन विहिरींच्या माध्यमाने साठवण करुन पाण्याची उपलब्धता करण्यात येत होती. या ठिकाणी पाण्याची कमतरता असल्याने पाणी साठवणुकीसाठी नदीपात्रात मोठ््या धरणाची आवश्यकता आहे. पाणी साठवण करण्याकरिता नवीन विहिरींची गरज आहे. या मुलभूत बाबीकडे दुर्लक्ष झाले. उलट बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाण्याची पूर्तता भागविण्यात आली. वाढती लोकसंख्या व पाण्याच्या मागणीतील वाढ लक्षात घेता बनगाव प्रादेशिक पुरवठा योजनेतील पाणी, मागणीवरील खर्च भागत नसल्याने प्रशासकांनी पाणी पुरवठा बंद केला व पूर्ववत नदी पात्रातील साठवणुकीतील पाण्याने नागरिकांची तहानभागविण्यात आली. परंतु नदीपात्रातील पाणी संपल्याने आमगाव येथे मागील चार दिवसांपासून खंडीत पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. (शहर प्रतिनिधी)नदीपात्रात धरण बांधकाम व्हावेनदीपात्रातून केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला सक्षम करण्यासाठी नदीपात्रात धरणाची आवश्यकता आहे. पावसाळ्यातील पाणी साठवणमुळे या भागात सिंचन वाढेल. तसेच नवीन विहीर बांधकामामुळे पाणी पुरवठ्यासाठी बळ मिळेल. या दृष्टीने प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. नदीपात्रात धरण व विहीर बांधकामाची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्थायी प्रशासनाअभावी अडचणीआमगाव येथील नागरिकांच्या नगर परिषदेच्या मागणीची योग्य दखल घेवून शासनाने तात्काळ निर्णय घेणे गरजेचे झाले आहे. आमगाव ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा बहाल केला होता, परंतु नागरिकांनी न्यायालयीन प्रक्रियेत नगरपंचायतचा निर्णय रद्द केला. त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायतचा कारभार सुरू झाला. मागील दीड वर्षापासून प्रशासकांचा कारभार होता. अस्थिर प्रशासनामुळे गावातील विकास कामे तसेच पाणी पुरवठा योजनेवरील कामे ठप्प पडली आहेत. यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्थायी प्रशासनासाठी व्यवस्था कधी होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.