शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया रेल्वे स्थानकावर पकडली ९ लाख ६० हजार रुपयांची रोकड; रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई

By अंकुश गुंडावार | Updated: April 3, 2025 19:03 IST

प्रकरण आयकर विभागाकडे सोपविले

गोंदिया : येथील रेल्वे स्थानकावर एक प्रवासी बॅग घेवून संशयास्पद स्थितीत वावरताना बुधवारी (दि.२) सायंकाळी ५ वाजताच्या आढळला. रेल्वे स्टेशनवर कर्तव्यावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याची चौकशी करुन त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात ८ लाख १० हजार व त्याच्या खिशात दीड लाख रोख असे एकूण ९ लाख ६० हजार रुपये आढळले. संबंधित व्यक्तीने पैशाची योग्य माहिती व पुरावे न दिल्याने ती जप्त करुन हे प्रकरण आयकर विभागाकडे सोपविण्यात आले.प्राप्त माहितीनुसार येथील रेल्वे स्थानकावरील रेल्वे स्टेशन व्यवस्थापक यांच्या कार्यालयासमोर एक व्यक्ती बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास एक बॅग घेवून संशयस्पद स्थितीत वावरताना आढळला. रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचाऱ्यांनी त्याची चौकशी करुन त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात ८ लाख १० हजार रुपये रोख, त्याच्या खिशातदीड लाख रुपये रोख असे एकूण ९ लाख ६० हजार रुपये आढळले.

याबाबत ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला विचारणा केली असता त्यांनी आपले नाव राकेश गोकुलदास आहुजा (५१) रा. मालवीय वॉर्ड रामचंद्र आइल मिलजवळ श्रीनगर असे सांगितले. रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याजवळ आढळलेल्या रोख रक्कमेबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच या रोख रक्कमे संदर्भात त्याच्याकडे कुठलेच कागदपत्रे नव्हती. त्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचारी आणि साक्षदारांच्या उपस्थितीत ईन कॅमेरा आरोपीचे बयान नोंदवून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच या प्रकरणाची माहिती आयकर विभागाला देऊन हे प्रकरण त्यांच्याकडे सोपविण्यात आले.हवालाची रक्कम असल्याचा संशय

संबंधित आरोपीकडे आढळलेल्या ९ लाख ६० हजार रुपयांच्या रक्कमे संदर्भात कुठलेच पुरावे दिले नाही तसेच कागदपत्रे सादर केली नाही. त्यामुळे ही रक्कम हवालासाठी तर जात नव्हती असा संशय व्यक्त केला जात आहे. 

यांनी केली कारवाईही कारवाई रेल्वे मंडळ टॉस्क फोर्स टीमचे प्रभारी निरीक्षक कुलवंत सिंह यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक धमेंद्र कुमार, आर.जी.मडावी, आर.आर.रायकवार व गुन्हे व गुप्तचर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.