गोंदिया: शहर व रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विविध चौकात विनाकरण फिरणाऱ्या ९८ जणांवर ३० एप्रिल रोजी कारवाई करण्यात आली. यात गोंदिया शहर पोलिसांनी नेहरू चौक, गांधी चौक, यादव चौक व जयस्तंभ चौक येथे विनाकारण फिरणाऱ्या व गर्दी करणाऱ्या ६५ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गर्दीमुळे कोराना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असतानाही, हे आरोपी प्रशासनाला सहकार्य न करता, कोरोनाचा संसर्ग पसरविण्यात मदत करतात. प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या ६५ लोकांवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८,२६९ अन्वये दाखल करण्यात आला आहे, तर रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या विविध चौकात विनाकारण फिरणाऱ्या ३३ जणांवर रामनगर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम १८८,२६९ अन्वये दाखल करण्यात केला आहे.
विनाकारण फिरणाऱ्या ९८ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:23 IST