शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीसाठी अनुकंपाधारकांचे सीईओंना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 22:30 IST

प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला जि.प. अंतर्गत येणारे सर्व अनुकंपा लाभार्थी बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी अनुकंपा संघर्ष समितीच्या वतीने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले.

ऑनलाईन लोकमतआमगाव : प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला जि.प. अंतर्गत येणारे सर्व अनुकंपा लाभार्थी बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी अनुकंपा संघर्ष समितीच्या वतीने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना निवेदन देण्यात आले.मागील कित्येक वर्षापासून अनुकंपासंबंधी भरती झाली नाही. त्यामुळे लाभार्थी आपली वयोमर्यादा ओलांडण्याच्या उंबरठ्यावर येवून पोहचले आहेत. घरातील कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. शासनाकडून मृत कर्मचाºयांच्या परिवारातील एका सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत समाविष्ट करण्याचा शासन निर्णय असून सुद्धा केवळ गोंदिया जि. प. च्या उदासीन कारभारामुळे अनुकंपा लाभार्थ्यांना वेळोवेळी उपेक्षा केली जात आहे. शासन निर्णय असून सुद्धा अनुकंपा धारकांवर एवढा अन्याय का? शासकीय सेवेत कार्यरत असताना कोणत्याही कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास सहा महिन्याच्या आत त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत समावेश करण्याचा नियम आहे. त्यामुळे या नियमाची अमलबजावणी करुन अनुकंपाधारक उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावी. अशी मागणी या वेळी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. राजा दयानिधी यांनी अनुकंपा हा विषय महत्वाचा असून येत्या मार्च किंवा एप्रिल २०१८ मध्ये सरसकट भरती करण्याचे आश्वासन दिले आहे. शिष्टमंडळात संजय हत्तीमारे, संज़य शहारे, श्रीकांत बडोले, योगेश पटले, अभय पालेवार, चंद्रकला ईरसरावत, ज्योती पटले यांचा समावेश होता.