शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कारची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:01 IST

तालुक्यातील मुंडीपार पेट्रोल पंपाजवळ झालेल्या मोटारसायकल व कारच्या अपघातात तीन जन गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकल शिवशाही बसच्या आत फरफटत गेली तर कारचा चेंदामेंदा झाला. सोमवारी (दि.२०) सायंकाळी ४ वाजतादरम्यान हा अपघात घडला.

ठळक मुद्देमुंडीपार पेट्रोल पंपाजवळ अपघात : दुचाकी शिवशाही खाली फसली

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील मुंडीपार पेट्रोल पंपाजवळ झालेल्या मोटारसायकल व कारच्या अपघातात तीन जन गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकल शिवशाही बसच्या आत फरफटत गेली तर कारचा चेंदामेंदा झाला. सोमवारी (दि.२०) सायंकाळी ४ वाजतादरम्यान हा अपघात घडला.प्राप्त माहितीनुसार, नागपूरवरुन गोंदियाकडे जाणाऱ्या शिवशाही बसने विरुद्ध दिशेने येणाºया वाहनाला पाहून ब्रेक लावले. शिवशाहीच्या मागोमाग असलेल्या मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-एसी ९३७२ च्या चालकानेही ब्रेक लावले. पण मोटारसायकलच्या मागे असलेल्या आय- १० कार क्रमांक एमएच ३५- सी ९४२ च्या महिला चालकाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक ऐवढी जबरदस्त होती की मोटारसायकल शिवशाहीच्या आत घुसली. तर कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातातील महिला चालक सालेकसा तालुक्यातील ग्राम साखरीटोला येथील एका खासगी शाळेच्या प्राचार्य असून त्यांचे नाव अजया चुटे आहे.त्यांच्या कारमध्ये देवांशी चुटे (१०,रा.आमगाव), तेजेश्वरी चुटे (१६,रा.राका) विशाखा दोनोडे (१६,रा.राका) व प्रणाली डोंगरे (१९,रा.राका) होते. तर मोटारसायकल वरील युवकाचे नाव नरेंद्र मेश्राम आहे. अपघातात अजया चुटे, नरेंद्र मेश्राम व कारमधील दोन मुली जखमी झाल्या असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले.