शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

घनकचऱ्याच्या समस्येवर तोडगा मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 06:00 IST

बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार हीच आता गोंदिया शहराची शान बनून राहिली आहे. शहरातील वस्त्या असो की वसाहती सर्वांची गत तीच आहे. सर्वत्र घाणीचे ढिगार आहे ते आहेच. नगर परिषदेकडून कचऱ्याची नित्यनेमाने उचल केली जाते मात्र दुसऱ्या दिवशी परिस्थिती तीच असते, ही आश्चर्याची बाब आहे.

ठळक मुद्देबघावे तेथे कचऱ्याचे ढिगार : सणासुदींचेही सोयरसुतक नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील घनकचऱ्याच्या समस्येवर नगर परिषदेला काही तोडगा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कारण बघावे तेथे लागलेले कचऱ्याचे ढिगार याची प्रचिती करवून देते. सण असो वा उत्सव मात्र कचऱ्याची ही समस्या सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शहरवासीयांचा श्वास कोंडत चालला असून आणखी किती दिवस या प्रकारात वावरावे लागणार असा सवाल आता शहरवासी करू लागले आहेत.जिल्ह्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या नगर पंचायत आपल्या पायावर उभे होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. स्वच्छतेसाठी नगर पंचायतींमध्ये नवनवे प्रयोग राबविले जात असून त्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र जिल्ह्याचे स्थळ असलेल्या गोंदिया नगर परिषदेला याचे काहीच सोयरसुतक नाही. कारण शहरातील कचऱ्याची स्थिती आता बारमाहीच झालेली आहे. दिवस उजाडत चालले आहेत मात्र शहरवासीयांना घाणीच्या विळख्यात श्वास घ्यावा लागत आहे.बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार हीच आता गोंदिया शहराची शान बनून राहिली आहे. शहरातील वस्त्या असो की वसाहती सर्वांची गत तीच आहे. सर्वत्र घाणीचे ढिगार आहे ते आहेच. नगर परिषदेकडून कचऱ्याची नित्यनेमाने उचल केली जाते मात्र दुसऱ्या दिवशी परिस्थिती तीच असते, ही आश्चर्याची बाब आहे. यातून स्वच्छतेसाठी पाहिजे तसे प्रयत्न होत आहे की नाही असा प्रश्न पडतो. ते काही असो, मात्र या सर्वांचा त्रास शहरवासी भोगत आहेत. यातून नगर परिषदेचा स्वच्छता विभाग कोठेतरी कमगकूवत पडत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. आजघडीला शहरवासीयांचा नगर परिषद व निवडून दिलेल्या नगरसेवकांवरून विश्वास उडत चालला आहे.कचऱ्याचे ढिगार, त्यावर डुकरांचे कळप व कचऱ्यातून दुर्गंध व डासांची उत्पत्ती आजारांना पोषक ठरत आहे. अशा या वातावरणात शहरवासीयांचे आरोग्य कितपत सुरक्षीत आहे, ही गंभीर बाब आहे.यावर मात्र नगर परिषदेकडून तोडगा काढणे कठीण दिसत आहे. यामुळेच शहराचे वातावरण दिवसेंदिवस दिवस प्रदुषीत होत चाचले असून शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत चालला आहे. त्यामुळे कचऱ्याच्या या समस्येवर त्वरीत तोडगा काढण्यात यावा अशी ओरड शहरवासी करीत आहेत.शहरातील कचराकुंड्या तुंबलेल्याचकचरा एकाठिकाणी जमा व्हावा या उद्देशातून शहरात प्रभागनिहाय कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. या कचराकुंड्या कचऱ्याने तुंबलेल्या असल्याचे दिसून येत असून कचरा बाहेर पडत आहे. मात्र स्वच्छता विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. परिणामी त्या परिसरात दुर्गंध पसरत आहे. एवढ्यावरही कचराकुंड्यांची स्वच्छता होत नसल्यास नगर परिषदेची जबाबदारी काय असा सवाल आता शहरवासी करीत आहेत.डासजन्य आजारांचा जोर वाढलाशहरात सध्या डासांचा प्रकोप वाढला आहे. यामुळे शहरात डासजन्य आजारांचा जोर वाढला आहे. रूग्णालयांत मोठ्या संख्येत रूग्णांची गर्दी वाढली असून यात मलेरियाचे रूग्ण जास्त असल्याची माहिती आहे. असे असतानाही नगर परिषद प्रशासनाला काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसते. स्वच्छता विभाग फक्त कचरा उचलून मोक ळा होतो. मात्र त्यापलीकडे दुसरी कोणतीच जबाबदारी त्यांच्यावर नसल्याचे जाणवते.