शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्ड नोंदणीतून उमेदवारांना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 22:28 IST

जिल्ह्यात ७ व ८ एप्रिलला घेण्यात आलेल्या होमगार्ड सदस्य नोंदणीमध्ये आयटीआय, खेळाडू, जडवाहन परवानाधारक, माजी सैनिक, एनसीसी, प्रमाणपत्रधारकांना आरक्षण देवून होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली.

ठळक मुद्देपाटणकर यांचा आरोप : अंशकालीन नोकरीच्या आशेवरच

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : जिल्ह्यात ७ व ८ एप्रिलला घेण्यात आलेल्या होमगार्ड सदस्य नोंदणीमध्ये आयटीआय, खेळाडू, जडवाहन परवानाधारक, माजी सैनिक, एनसीसी, प्रमाणपत्रधारकांना आरक्षण देवून होमगार्ड सदस्य नोंदणी करण्यात आली. मात्र या सदस्य नोंदणी दरम्यान अंशकालीन काम करणाऱ्या उमेदवारांना आरक्षण न देता डावल्याचा आरोप अर्जुनी मोरगाव तालुका अंशकालीन बेरोजगार संघटनेचे संघटक चिचोली येथील प्रल्हाद पाटणकर यांनी केला आहे.अंशकालीन काम करणाºया उमेदवारांना तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, पोलीस भरतीसह इतर विभागतून कर्मचाºयांची भरती प्रक्रियेमध्ये अंशकालीन उमेदवारांना आरक्षण देवून सेवेत सामावून घेतले जाते. मात्र ७ व ८ एप्रिलला जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आलेल्या होमगार्ड सदस्य नोंदणी दरम्यान अंशकालीन उमेदवारांना डावलून उमेदवारांवर अन्याय केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यामुळे होमगार्ड नोंदणी प्रक्रियेतून अंशकालीन उमेदवारांचे आरक्षण संपविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. संबंधीत विभागाची अंशकालीन उमेदवारांविषयी असलेली उदासीनता पुढे आली आहे. सतत तीन वर्ष तुटपुंज्या ३०० रुपये मानधनावर शासकीय कामे करुन शासनास मदत केली. शासन मागे पुढे आपल्याला आरक्षण देवून नोकरीत सामावून घेईल या आशेवर अंशकालीन उमेदवार जगत आहेत. कर्मचारी प्रवेश प्रक्रियेमधून डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. उमेदवारांमध्ये शासनाप्रती रोष व्याप्त आहे. कोणत्याही शासकीय नोकर भरती प्रक्रियेमध्ये अंशकालीन उमेदवारांना प्रथम प्राधान्य द्यावे अशी मागणी अंशकालीन बेरोजगार संघटक पाटणकर यांनी केली आहे.