शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संचालक मंडळास दिलेली मुदतवाढ केली रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:11 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत १८ नोव्हेंबर २०१७ रोजी संपुष्टात आली. तत्पुर्वी निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यातच शासनाच्या पणन व वस्त्रद्योग विभागाने सध्याच्या संचालक मंडळाला .....

ठळक मुद्देशासन निर्णय बदलला : कृउबास निवडणूक प्रकरण

ऑनलाईन लोकमतगोंदिया : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत १८ नोव्हेंबर २०१७ रोजी संपुष्टात आली. तत्पुर्वी निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यातच शासनाच्या पणन व वस्त्रद्योग विभागाने सध्याच्या संचालक मंडळाला निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत अथवा नवीन संचालक पदारुढ होईपर्यंतच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याची मंजूरी १२ मार्च रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार दिली होती. मात्र १३ मार्च रोजी पुन्हा पणन व वस्त्रोद्योग विभागाने नवीन आदेश निर्गमित करुन ही मुदतवाढ रद्द करण्यात येत असल्याचे आदेश काढले आहे. यामुळे बाजार समितीच्या निवडणूक तसेच प्रशासकांच्या नियुक्तीला घेवून चांगलीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला घेऊन सर्वच पक्ष उत्साहीत आहेत. अशातच विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडेल, अशी आशा होती. मात्र, शासनाने शेतकरी गटातून १५ संचालक निवडून देण्याचे नव्याने निर्देश दिल्याने संचालक मंडळात बदल झाला. त्या अनुषंगाने तालुक्यातील गावाची वाटणी तसेच मतदारांची संख्याही निश्चित करण्यात आली. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर शेतकरी गटातून ५ संचालकांसाठी आरक्षणही जाहीर करण्यात आले. अशातच जिल्हा निबंधक कार्यालयाच्यावतीने निवडणुकीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्याची मागणी बाजार समितीकडे केली.परंतु निवडणुकीसाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करुन निवङणूक पुढे ढकलण्याचे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले होते. यामुळे बाजार समितीवर प्रशासक बसविण्यात येईल, अशी चर्चा होती. परंतु १२ मार्च रोजी राज्य शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने शासन आदेश निर्गमित करुन महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ कलम ५९ नुसार अधिकाराचा वापर करुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळास १९ नोव्हेंबर २०१७ पासून निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत अथवा नवीन संचालक पदारुढ होतपर्यंत या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले.मात्र, दुसºयाच दिवशी पुन्हा सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळास मुदतवाढ देण्याबाबत शासनाचे स्पष्ट आदेश नसल्यामुळे शासन आदेशानुसार ही मुदतवाढ रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय काढला व त्याची माहिती पणन संचालकासह जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व कृषी उत्पन्न बजार समिती यांना दिली आहे.विशेष म्हणजे, एका दिवसातच निर्णय बदलण्याची वेळ शासनावर का आली? असा सवाल विद्यमान संचालक मंडळाने उपस्थित केला आहे. त्यातच शासनाचा मनसुबा बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्याचा असावा, अशीही चर्चा या आदेशाने सुरु झाली आहे. या निर्णयामुळे एकंदरीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.