शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

डीबीटी नियम रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:58 IST

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वस्तीगृहात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना आहाराकरिता थेट रक्कम (डीबीटी) त्यांच्या आधार संलग्नीत खात्यात जमा करण्याबाबतचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी आमदार संजय पुराम यांनी केली आहे.

ठळक मुद्देसंजय पुराम : आदिवासी विकास मंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वस्तीगृहात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना आहाराकरिता थेट रक्कम (डीबीटी) त्यांच्या आधार संलग्नीत खात्यात जमा करण्याबाबतचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी आमदार संजय पुराम यांनी केली आहे. त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची भेट घेऊन मंगळवारी (दि.१७) सादर केले.आमदार पुराम यांनी आपल्या निवेदनात, शासनाने ५ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार शासकीय वस्तीगृहात राहणाºया अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना आहाराकरिता थेट रक्कम त्यांच्या बँक खात्यात टाकल्याने जेवणाकरिता विद्यार्थ्यांना भटकावे लागेल. ग्रामीण भागात असलेल्या शासकीय वस्तीगृहाच्या ठिकाणी खाजगी खाणावळ उपलब्ध नाहीत. तसेच रात्रीचे जेवन खाजगी खाणावळीत करण्याकरिता सायंकाळी ७ नंतर जाणे उचित वाटत नाही व ग्रामीण भागात खाजगी खाणावळी नाहीतच. तसेच सदर पैसे एकाचेवळी जमा झाल्यामुळे समजा विद्यार्थ्याने सदर पैसे एका अठवड्यात खर्च केले तर, २२ दिवसांत त्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण होवू शकतो.याबाबत आदिवासी विद्यार्थ्याकडून निवेदन प्राप्त झाले असून त्यानुसार मागणी केलेली आहे. करिता डिबीटी संदर्भातील नवीन निर्णय रद्द करण्यात यावा व शासकीय वस्तीगृहात महिला बचत गटांना सदर खाणावळीचे कंत्राट देण्यात यावे. तसेच पूर्ववत असलेली योजना सुरु ठेवण्यात यावी अशी मागणी आमदार पुराम यांनी आदिवासी विकास मंत्री सावरा यांना निवेदन देवून केली आहे. यावेळी नामदार सावरा यांनी संबंधित अधिकाºयांकडून अहवाल मागवून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी प्रधान सचिव मनिषा वर्मा, विनोद अग्रवाल व भरत दुधनाग उपस्थित होते.