शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

१६ जुलैचे परिपत्रक रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 21:23 IST

१६ जुलैचे अंगणवाडी कर्मचारी विरोधी परिपत्रक रद्द करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) जिल्हा शाखेच्यावतीने गुरूवारी (दि.३०) जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावाने मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देअंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी : जिल्हा परिषदेवर धडकला मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : १६ जुलैचे अंगणवाडी कर्मचारी विरोधी परिपत्रक रद्द करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) जिल्हा शाखेच्यावतीने गुरूवारी (दि.३०) जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावाने मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.राज्याच्या महिला-बाल विकास विभागाचे सहचिव ला.रा.गुजर यांच्या स्वाक्षरीने १६ जुलै रोजी २५ पेक्षा कमी मुले ज्या अंगणवाडीत आहेत अशा अंगणवाडीतील मुले जवळील अंगणवाडीत समाविष्ट करा असे परिपत्रक काढले. राज्यात ५५३ प्रकल्पांची फेररचना करून प्रकल्प संख्या कमी करणे म्हणजेच अधिकारी, कर्मचारी, सेविका ते मदतनीस पर्यंत सर्वांचीच कपात करणे हे या पत्रकातून स्पष्ट होते.करिता अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनने या परिपत्रकाला निषेध करून १६ जुलै रोजीचे परिपत्रक रद्द करावे, अंगणवाडी सेविका-मदतनीस, मिनी अंगणवाडी यंचे भाऊबीजचे थकीत एक हजार रूपये देण्यात यावे व ज्या प्रकल्प अधिकाऱ्याने लापरवाही केली त्यावर कारवाई करावी, सेवा मुक्त अंगणवाडी सेविका-मदतनीस यांना सेवानिवृत्ती नंतर एकरकमी लाभ देण्याबाबत ३० एप्रिल २०१४ रोजी शासना निर्णयावर अमल न करणाऱ्या महिला बाल कल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाई करून गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत ११२ कर्मचाऱ्यांना त्वरीत लाभ देण्यात यावा, आहार भत्ता व अमृत आहारचे प्रलंबित बिल काढण्यात यावे तसेच प्रलंबित प्रवास भत्ता देण्यात यावा व अनेक प्रकल्पांचे भत्ते कार्यालयीन चुकीमुळे देण्यात आले नाही करिता सन २०१३ ते २०१८ पर्यंतची चौकशी करण्यात यावी अशी मागणी अंगणवाडी-बालवाडी कर्मचाऱ्यांनी केली.आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी-बालवाडी कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि.३०) जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.याप्रसंगी आयटकचे दिलीप उटाणे, हौसलाल रहांगडाले, शकुंतला फटींग, आम्रकला डोंगरे, जिवनकला वैद्य, विना गौतम, विजया डोंगरे, ब्रिजुला तिकडे, सुनिता मलगामे, दुर्गा संतापे, पौर्णिमा चुटे, जयकुवर मच्छीरके, वच्छला भोंगाडे, कांचन शहारे, अर्चना मेश्राम, अंजना ठाकरे, पुष्पलता भगत, प्रणिता रंगारी, विठा पवार, प्रतिभा दहीकर यांच्यासह मोठ्या संख्येत अंगणवाडी व बालवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.

टॅग्स :Morchaमोर्चा