शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: March 3, 2016 01:45 IST

बाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव येथील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

कालव्यावर रस्ते, घर बांधकाम : सिंचन सुविधा वाढविण्यात अपयशयशवंत मानकर आमगावबाघ इटियाडोह पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव येथील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कालव्यांची दुरुस्ती, सिंचनवाढ याकडे पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी मिळणारी सिंचन सुविधा नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. या विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील कामांची चौकशी व्हावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.आमगाव येथील बाघ इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापनातील उपविभागीय कार्यालयाच्या दुर्लक्षितपणामुळे कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने कोट्यवधींचा निधी कालवे बांधकामाकरिता दिला आहे. परंतु सिंचनातील महत्त्वाचे कालवे योग्य व्यवस्थापनातून बाद झाले आहेत. अनेक भागातून जाणारे कालवे दुरुस्ती व बांधकामाअभावी फुटले आहेत. त्यामुळे पाण्याचे अपव्यय वाढले आहे. कालव्यांमधील स्वच्छता व देखरेख यासाठी शासनाने नियमित कर्तव्य ठरवून दिलेले आहेत. परंतु अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे कालव्यांची विल्हेवाट लावली जात आहे.बाघ इटियाडोह पाटबंधारे उपविभागांतर्गत पुजारीटोला, कालीसराड, सिरपूर या धरणांसह कालव्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शासनाने निश्चित केली आहे. पाणी साठवून धरणातील सिंचन सुविधा व कालव्यांच्या व्यवस्थापनाकरिता शेतकऱ्यांकडून मागणी वाढत असताना धरण व कालव्यांच्या व्यवस्थापनाकडे प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होते. त्यामुळे सिंचन सुविधेपासून शेतकऱ्यांना वंचित व्हावे लागत आहे.आमगाव, बनगाव व रिसामा या परिसरातून बांधकालव्यांची जागा खासगी वापराकडे गेली आहे. या परिसरात धरणाकडून येणारे कालवे लोकवस्तींनी वेढले आहे. पाण्याचे विचरण योग्य पद्धतीने व्हावे यासाठी कालव्यांच्या भूमीलगत प्रतिबंधक अशी उपाययोजना असल्याने त्याची सुरक्षितता विभागावर आहे. परंतु विभागाकडूनच या कालव्यावर पक्के अतिक्रमण करण्यासाठी पाठबळ दिल्याने कालव्यांवर पक्के बांधकाम करुन नागरिकांनी उपयोगात आणले आहे. त्यामुळे कालवे संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.उपविभाग आमगाव अंतर्गत येणारे सिंचन धरणे यातील सिंचन वाढीचे प्रयत्न विभागाकडून झालेच नाही. त्यामुळे सिंचनातील पाण्याची वाढ करण्यात विभागाला अपयश आले. दरवर्षी शेतकऱ्यांना शेतपिकासाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता व मागणी यात तफावत निर्माण होत असल्याने शेतकरी पिकांपासून वंचित होत आहेत. शेतकऱ्यांनी अनेकदा विभागाला सिंचन सुविधा वाढविण्याची मागणी केली. परंतु या प्रकाराला विभागाने गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे पाण्याअभावी हातातील पिके गमावण्यासाठी शेतकऱ्यांना बाध्य व्हावे लागले.आमगाव उपविभागात शासनाने विविध उपाययोजना अंतर्गत निधी उपलब्ध करुन सिंचन सुविधा तत्पर करण्यासाठी योजना कार्यान्वित केली. परंतु याचा उपयोग सुविधांसाठी झालेच नसल्याचे निदर्शनात येते. कालव्यांची दुरवस्था, अपुरे सिंचन प्रकल्प यामुळे शेतकऱ्यांची फसगत होत आहे. शासनाने या विभागाला किती निधी दिला याचा शोध घेऊन तो विभागाने कुठे उपयोगात आणला याची आता चौकशी व्हावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. विभागाच्या कामचुकारपणामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे रबी पिकासाठी टाकलेले बियाणे जमिनीत मुरले. तर रबी पिकापासून शेतकऱ्याला वंचित व्हावे लागेल.