शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: January 17, 2015 01:50 IST

शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने धरणांची उभारणी केली. ते पाणी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यांची निर्मिती करण्यात आली.

आमगाव : शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने धरणांची उभारणी केली. ते पाणी शेतापर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यांची निर्मिती करण्यात आली. परंतु त्या कालव्याचे योग्य व्यवस्थापनच नसल्यामुळे त्यांची दुरवस्था झाली आहे. सोबतच त्यावर काही लोकांनी अतिक्रमणही केले आहे. आमगाव तालुक्यात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.तालुक्यातील शेतकरी उपलब्ध सिंचन सुविधांच्या माध्यमातून धानासह कडधान्य, गळीतधान्य व भाजीपाल्याची लागवड करुन उत्पन्न घेत असतात. शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेल्या सिंचनाच्या सोयींचा पुरेपूर वापर झाल्यास त्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतात. परंतु या कालव्यांचे व्यवस्थापन प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे धोक्यात आले आहे.आमगाव तालुक्यातील ८४ गावांतील शेतकऱ्यांना उपलब्ध होणारे सिंचनाचे पाणी कालव्यांच्या माध्यमाने पुरविले जाते. तालुक्यातील २२३२६ हेक्टर खरीप, तर रबी ३४३० हेक्टर व बागायती ९१९३ हेक्टर क्षेत्र आहे. या क्षेत्राला लघुप्रकल्प व इतर सिंचन सुविधांच्या माध्यमाने सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. कालव्यांचे जाळे शेतशिवारातून ते शहरातील मुख्य भागामधून टाकण्यात आले आहेत. या कालव्यांच्या लगत लोकवस्तीही निर्माण झाली आहे. परंतु लोकवस्ती निर्माण होताना कालव्यांचे व्यवस्थापन बघणारा बाघ पाटबंधारे व्यवस्थापन विभाग याबाबत पूर्णत: बेफिकीर असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक व्यक्तींनी धरण कालव्यांची जमीन बळावल्याचा प्रयत्न केला. यातूनच शहरी भागातून कालव्यांचे अस्तित्व धोक्यात आले. अनेक व्यक्तींनी कालव्यांवर पक्के रस्ते बनविले. काही कालव्यांवरच पक्क्या इमारती बांधकामाचे नियोजन केले. कालव्यांची जागा मुख्य केंद्रातून मोजण्यात येते. मोठे कालवे हे ८० मिटर रुंदीचे तर लहान कालवे २० मिटर रुंदीचे आहेत. शासनाने भूसंपादन करताना या जागेची रितसर लेखणी केली. परंतु व्यवस्थापन बघणाऱ्या विभागाने या कालव्यांची परस्पर विल्हेवाट लावली. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले हे कालवे भविष्यात शोधावे लागण्याची पाळी येणार आहे. (शहर प्रतिनिधी)