शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

उमेदवार प्रचारात, शेतकरी लागवडीत व्यस्त

By admin | Updated: June 21, 2015 01:06 IST

जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे चित्र सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

अडचणी : माघार घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवसगोंदिया : जिल्हा परिषद आणि आठही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे चित्र सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या तरी सर्वच उमेदवारांनी डोक्याला बाशिंग बांधले असले तरी किती लोकांनी रिंगणात माघार घेतली हे सोमवारी स्पष्ट झाल्यानंतर निवडणुकीचा खरा रणसंग्राम सुरू होणार आहे. दुसरीकडे दररोज पावसाची हजेरी सुरू असल्यामुळे उमेदवारांच्या प्रचारात चांगलाच व्यत्यय येत आहे.येत्या ३० जूनला मतदान होणार असल्याने उमेदवारांना आता प्रचारासाठी अवघे ८ दिवस उरले आहेत. या आठ दिवसात मतदार संघातील सर्व गावांमध्ये पोहोचून जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क करणे उमेदवारांसाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. दुसरीकडे बहुतांश मतदार शेतकरी आहेत. सतत पाऊस येत असल्याने सर्व शेतकऱ्यांना पेरणीचे वेध लागले आहेत. त्यासाठी बियाण्यांची सोय करण्यात आणि पेरणी करण्यात शेतकरी वर्ग व्यस्त आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग दिवसभर शेतीच्या कामात व्यस्त राहून रात्रीच्या वेळी निवडणुकीच्या चर्चांमध्ये रंगताना दिसत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)अद्याप आचारसंहिता भंग नाहीजिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ३ लाख रुपये तर पंचायत समिती निवडणुकीसाठी २ लाख रुपयांची खर्च मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे विधानसभा-लोकसभा निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीही पहिल्यांदाच निरीक्षकांची (आॅब्झर्वर) नियुक्ती करण्यात आली आहे. दोन तालुक्यांमिळून एक असे चार निरीक्षक जिल्ह्यात आहेत. मात्र अद्यापपर्यंत आचारसंहिता भंग झाल्याचा एकही गुन्हा नोंद झाला नसल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.