शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

गप्पी मासे टाकण्याची मोहीम सुरू

By admin | Updated: August 26, 2014 00:03 IST

शहरात डासांचा प्रकोप वाढत चालला असला तरीही नगर पालिकेकडून अद्याप गप्पी मासे टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली नव्हती. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत असल्याचा

पालिकेला जाग : मामा चौक व शास्त्री वॉर्डात टाकले मासेगोंदिया : शहरात डासांचा प्रकोप वाढत चालला असला तरीही नगर पालिकेकडून अद्याप गप्पी मासे टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली नव्हती. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत असल्याचा हा प्रकार ‘लोकमत’ ने पुढे आणला. अखेर लोकमतच्या बातमीची दखल घेत पालिकेने सोमवारपासून (दि.२५) शहरात गप्पी मासे टोकण्याची मोहीम सुरू केली. पहिल्या दिवशी शहरातील मामा चौक व शास्त्री वॉर्डात मासे टाकण्यात आली.जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाने थैमान घातले आहे. यापासून गोंदिया शहरसुद्धा सुटलेले नाही. शहरातही डेंग्यू व मलेरियाचे रूग्ण आढळून येत आहेत. डेंग्यू, मलेरिया व फायलेरिया हे डासजन्य आजार असून यातील डेंग्यू व मलेरिया हे जीवघेणे आजार आहेत. विशेष म्हणजे यामुळे जिल्ह्यात कित्येकांचा जीवही गेला आहे. या आजारांपासून मुक्ती मिळविण्यासाठी डासांचा नायनाट करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात जिल्हा हिवताप विभाग नजर ठेवते तर शहरात मात्र नगर पालिकेची जबाबदारी असते. त्यातही डासांची उत्पत्ती थांबविण्यावर योग्य तोडगा म्हणजे गप्पी मासे आहेत. हिवताप विभागाकडून पालिकेला गप्पी मासे दिली जातात. पालिकेला हे गप्पी मासे पाण्याच्या डबक्यांत सोडावी लागतात. दरवर्षी पालिका यासाठी विशेष मोहीम राबविते. त्यानुसार, यंदाही हिवताप विभागाने पालिकेला गप्पी मासे उपलब्ध करवून दिली. पालिकेकडे यासाठी विशेष गप्पी मासे पैदास केंद्रही आहे. त्यात मोठ्या प्रमाणात गप्पी मासे आहेत. यंदा मात्र गंभीर स्थिती निर्माण झालेली असतानाही पालिकेकडून अद्याप गप्पी मासे सोडण्यात आलेली नाहीत. यावर लोकमतने बातमीच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता. विशेष म्हणजे लोकमतच्या बातमीची दखल घेत पालिकेच्या स्वच्छता विभागाने सोमवारपासून (दि.२५) शहरात गप्पी मासे सोडण्याची मोहिम हाती घेतली. यांतर्गत शहरातील मामा चौक व शास्त्री वॉर्डात असलेल्या पाण्याच्या डबक्यांत पालिकेचे आरोग्य निरीक्षक गणेश हतकय्या व मुकेश तिवारी यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेत गप्पी मासे सोडली. या मोहीमेंतर्गत आता शहरातील प्रत्येक वॉर्डातील पाण्याच्या डबक्यांत गप्पी मासे सोडली जाणार आहेत. (शहर प्रतिनिधी)