देशी व हातभट्टीला उधाण : तंटामुक्त समित्या झाल्या थंड? गोंदिया : जिल्हा पोलिसांनी मंगळवारी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून अवैध दारू विक्रेत्यांकडून माल जप्त करून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गावातील अवैध दारूला लगाम लावण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पोलिसांना माहिती पुरविण्याची गरज आहे. गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सर्वाटोला येथील जयप्रकाश उर्फ बालू आत्माराम दिवटे (३२) याच्याकडून ७ लिटर मोहफुलाची दारू फुलचूर येथील मुन्नालाल धनलाल बिसेन (४१) याच्याकडून ४ लिटर हातभट्टीची दारू, चुलोद येथील आशा अजय नागदेवे या महिलेकडून आसोली येथून ३ नग देशी दारूचे पव्वे, गंगाझरी पोलिसांनी एकोडी येथील लखन रामाजी वाढवे (५६) याच्याकडून ४ लिटर हातभट्टीची दारू, गंगाझरी येथील राजु कारू चिचखेडे याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू, इसाटोला येथील निलकंठ काशीराम दिहारी (४०) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू, चैनलाल यशवंत तांडेकर (३८) याच्याकडून ६ लिटर हातभट्टीची दारू, कवलेवाडा येथील रुपचंद बानसु लटये याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू, शहारवाणी येथील होलीराम मारोती गौतम (६०) याच्याकडून ४ लिटर हातभट्टीची दारू, गोंदिया शहर पोलिसांनी भीमनगरातील प्रभा उत्तम मेश्राम हिच्याकडून ६ लिटर हातभट्टीची दारू, निशांत उत्तम मेश्राम याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू, मनोहर गुनाराम खंडारे (६०) याच्याकडून ७ लिटर हातभट्टीची दारू, चुटिया रोड, पिंडकेपार मुर्री सुरज सोमाजी बघेले (४०) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू, पिंडकेपार येथील सविता रघुनाथ नागरीकर (३५) हिच्याकडून ३ लिटर हातभट्टीची दारू, सेंद्रीटोला येथील गरीबदास लटारू उके (७०) याच्याकडून ४ लिटर हातभट्टीची दारू, कुंभारेनगरातील विजय प्रेमलाल भालाधरे (६०) याच्याकडून १८० मिलीची देशी दारू जप्त करण्यात आली. रावणवाडी पोलिसांनी सावरी येथील प्रेमानंद गंगाराम डहाटे (५५) याच्याकडून ५ नग देशी दारूचे पव्वे, मनोज शिवप्रसाद मंडीया (३५) याच्याकडून ६ नग देशी दारूचे पव्वे, बिरसी येथील दिनेश छोटेलाल वंजारी (४५) याच्याकडून ७ लिटर हातभट्टीची दारू, जगनटोला येथील अरूणा माणिकचंद गेडाम (६०) हिच्याकडून ५ नग देशी दारूचे पव्वे, बघोली येथील फेदूलाल बुधा शिवणकर (५२) याच्याकडून ५ लिटर मोहफुलाची दारू, किन्ही येथील अशोक सुदाम डहाट (४५) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू, बघोली येथील मनीष दुर्योधन डहाट (३५) याच्याकडून ६ नग देशी दारूचे पव्वे, अनिता सत्येंद्र चौरे (४५) हिच्याकडून ८ नग देशी दारूचे पव्वे, किन्ही येथील प्रमिला रामकृष्ण बंसोड (५०) हिच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू, लहीटोला येथील केशोराव विठू बागडे (५०) याच्याकडून ६ नग देशी दारूचे पव्वे, अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी बोंडगावदेवी येथील रामनाथ मोनू मेश्राम (३५) याच्याकडून १२ नग देशी दारूचे पव्वे, यशवंत बाबुराव शहारे याच्याकडून १८० मिलीचे ९६ देशी दारूचे पव्वे, माहुरकुडा येथील श्रीराम नारायण गोव्टीपरतीवार (५०) याच्याकडून १० देशी दारूचे पव्वे, वडेगाव येथील गायत्री संदीप सिलेवार(२९) हिच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, तिरोडा पोलिसांनी आंबेडकर वार्डातील अमित लालाजी उके (२९) याच्याकडून १२ लिटर हातभट्टीची दारू, करटी येथील शिशुपाल प्रेमलाल बोरकर (४८) याच्याकडून २० लिटर हातभट्टीची दारू, सुकडी-डाकराम येथील रोशन बबन उके (२८) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारू, संत सज्जन वार्डातील मेघा अनमोल घोडीचोर (३४) हिच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारू, नाना चरणदास उके (५१) याच्याकडून ७ देशी दारूचे पव्वे, रामनगर पोलिसांनी कटंगी कला येथील चंद्रप्रभा प्रितीलाल मेश्राम (५८) रा. कटंगीकला हिच्याकडून ८ नग देशी दारूचे पव्वे, दिनदयाल वार्डातील श्रनजप देवदास मेश्राम (३५) याच्याकडून ५ नग देशी दारूचे पव्वे, अंगुर बगीचा गोंदिया येथील महेश रामपाल नागपुरे (२४) याच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू, कटंगटोला येथील सुनिल रामदास नागदवने (४०) याच्याकडून ५ नग देशी दारूचे पव्वे, राणी अवंती चौकातील सोनू उर्फ शंभुलाल गोपाल शेंडे (६५) याच्याकडून ३५ नग देशी दारूचे पव्वे, गोरेगाव पोलिसांनी हिरडामाली येथील मधुकर भागवा रामटेके (४६) याच्याकडून ७ नग देशी दारूचे पव्वे, शहर पोलिसांनी झोपडी मोहल्ला यादव चौकातील दिपक नारायण मोरे (५०) ५ नग देशी दारूचे पव्वे, तिरोड्याच्या संत रविदास वार्डातील शशिकला पुरणलाल बिंझाडे (४५) हिच्याकडून १५ लिटर हातभट्टीची दारू, पुष्पा प्रल्हाद तांडेकर (४५) हिच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारू, रवि राधेश्याम खरोले (३६) हिच्याकडून ७ लिटर हातभट्टीची दारू, अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी माहुरकुडा येथील मोरेश्वर रामकृष्ण खंडाईत (३५) याच्याकडून १२ नग देशी दारूचे पव्वे, रामनगर पोलिसांनी कटंगीकला येथील विनोद छोटेलाल उके (५०) याच्याकडून १० नग देशी दारूचे पव्वे, रावणवाडी येथील नुरकांता सावंत फसफसे (६०) हिच्याकडून ५ लिटर हातभट्टीची दारू, श्यामवंती धर्मू लिल्हारे (५०) हिच्याकडून ४ लिटर हातभट्टीची दारू, राजेश रुपलाल लिल्हारे (३०) याच्याकडून ५ नग देशी दारुचे पव्वे जप्त करण्यात आले. सदर आरोपीविरूध्द मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
अवैध दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम
By admin | Updated: December 29, 2016 01:27 IST