शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वन्यजीव विभागाने लावले शेंडा परिसरातील शेतात कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:08 IST

शेंडा कोयलारी हे गाव चारही बाजूने जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात वन्य प्राण्यांची नेहमीच रेलचेल असते. जंगल परिसराला लागूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वन्यप्राण्यांकडून मोठे नुकसान केले जाते.

ठळक मुद्देवन्यजीव विभागाची दखल : नुकसानभरपाईचा घेणार आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोलयारी) : शेंडा कोयलारी हे गाव चारही बाजूने जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात वन्य प्राण्यांची नेहमीच रेलचेल असते. जंगल परिसराला लागूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वन्यप्राण्यांकडून मोठे नुकसान केले जाते. परिणामी शेतकरी दिवसेंदिवस हवालदील होत आहेत. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची तक्रार वनविभागाकडे वारंवार केली जाते. मात्र वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ केली जाते.यावर तोडगा काढण्यासाठी वन्यजीव विभागाने पुढाकार घेवून येथील शेतकरी लेमनदास पाटील लिल्हारे यांच्या शेतात प्राण्यांचा आवाज काढणारा भोंगू व सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने त्यामध्ये वन्यप्राण्यांचे फोटो कैद झाले आहेत.येथील शेतकरी लिल्हारे यांची जवळच असलेल्या मोहघाटा येथे बारा एकर शेती आहे. त्यांच्या शेतात ऊस व धानाच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्यांच्या शेतातील शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच शेंडा, कोयलारी, कोहळीपार, प्रधानटोला, आपकारीटोला, मसरामटोला, पांढरवाणी येथील शेतकरी सुद्धा वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रस्त आहेत.अशातच वन्यजीव विभागाने पुढाकार घेवून शेतमालाचे नुकसान कोणकोणत्या वन्य प्राण्यांमुळे होते, हे शोधण्यासाठी लिल्हारे यांच्या शेतात प्राण्यांचा आवाज काढणारे भोंगू व सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचे फोटो कैद झाले आहेत. या कॅमेºयाच्या एक फर्लांग अंतरावरील परिसरात कोणताही प्राणी अडकल्यास त्याचा फोटो आपोआप कॅमेºयात टिपला जातो. या परिसरात रानहल्ले, रानडुक्कर, अस्वल, निलघोडे, सांबर, चितळ तसेच हरणाच्या कळपांचा वावर राहतो. उन्हाळ्याला सुरुवात होताच पाण्याच्या शोधात गावाकडे, शेताकडे धाव घेतात. शेतात लावलेल्या धानपिकाची हिरवळ व ऊस खावून तृष्णा भागवतात. मात्र अशातच शेतमालाचे मोठे नुकसान करतात. काही शेतकºयांना तर वन्यप्राण्यांच्या हैदोसाने त्रासून रात्रभर शेतमालाची राखण करावी लागते.वन विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. जंगलाच्या चारही बाजूने काटेरी कुंपन केल्यास व पाण्यासाठी जंगलातच पाणवठे तयार केल्यास वन्य प्राणीही सुरक्षित राहतील व शेतमालाचे नुकसानही होणार नाही.