शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शिकारीसाठी आला अन् पिंजऱ्यात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2017 00:12 IST

वनालगत असणाऱ्या गावांमध्ये वन्यप्राणी येण्याच्या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत.

कोहलगावात बिबट्याचा धुमाकूळ : दिवसभर दोन घरांत आश्रय, पाच कोंबड्या ठार नवेगावबांध : वनालगत असणाऱ्या गावांमध्ये वन्यप्राणी येण्याच्या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत. पण बुधवारी नवेगावबांधजवळच्या कोहलगाव या गावात पहाटे-पहाटे बिबट्याने एका घरात शिरून गावकऱ्यांची चांगलीच भंबेरी उडविली. या बिबट्याने तब्बल दुपारी ४ वाजेपर्यंत एका घरातून दुसऱ्या घरात जाऊन नागरिकांची तारांबळ उडविली. शेवटी वनविभागाच्या पथकाला त्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. बुधवारी पहाटेच्या सुमारास कोहलगाव येथील दादाराव साखरे यांच्या घरात एक बिबट्या कोंबड्यांची शिकार करण्यासाठी शिरला. त्यांच्या घरी असलेल्या पाच कोंबड्या त्याने ठार मारल्या व आतील खोलीत नेऊन ठेवल्या. सकाळी उठल्यानंतर साखरे हे कोंबड्या बघायला गेल्यानंतर त्या गायब झालेल्या दिसल्या. इकडे-तिकडे शोध घेतल्यानंतर आतील खोलीत मेलेल्या कोंबड्या व बिबट दिसला. त्यामुळे एकच आरडा-ओरड सुरू झाली. त्यामुळे बिबट तेथून पळाला व चुन्नीलाल टेंभुर्णे यांच्या बाथरुममध्ये घुसला. तेथूनही निसटून तो सकाळी आठ वाजताच्या सुमारास सुरेश शहारे यांच्या घरात शिरला. त्याने दिवसभर तिथे मुक्काम ठोकला. दरम्यान किशोर जांभुळकर यांची एक शेळी देखील त्याने जखमी केली. सकाळी ९ वाजेच्या सुमारास वन्यजीव विभागाचे बचाव पथक आले. अथक प्रयत्न करुन देखील दिवसभर बिबट्याला पकडण्यात त्यांना यश आले नाही. शेवटी दुपारी चार वाजताच्या सुमारास बिबट पिंजऱ्यात शिरला आणि अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. सुदैवाने या धावपळीत कोणीही जखमी झाले नाही. सदर बिबट्याचे वय सुमारे साडेतीन वर्षे असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी नवेगाव, नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक पाठक, ए.सी.एफ. गीता पवार, ए.सी.एफ. उदापुरे, वन्यजीव विभागाचे कर्मचारी, बचाव पथकाचे कर्मचारी, डॉ. दीपक मंदिकुंटावार, डॉ.बावणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)