शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ई-रिक्षाचे खरेदीदार दुहेरी कर्जात

By admin | Updated: August 31, 2016 00:23 IST

ई-रिक्षा वाहन योग्य की अयोग्य, अशा द्विधा मन:स्थितीत सदर वाहनांचे चालक आहेत. परंतु आक्षेपार्ह

बन्सोड यांना निवेदन : कंपनी व डीलरवर कारवाई करण्याची मागणी काचेवानी : ई-रिक्षा वाहन योग्य की अयोग्य, अशा द्विधा मन:स्थितीत सदर वाहनांचे चालक आहेत. परंतु आक्षेपार्ह वाहने बाजारात आणण्याची परवानगी देणारे व उत्पादन करणारे दोषी आहेत. ज्या जिल्ह्यात बंदी आहे, त्या जिल्ह्यात सदर वाहने कशी आलीत, ही महत्वपूर्ण बाब आहे. खरेदीदारांना याची जाणीव पूर्वीच करण्यात आली असती तर तिरोड्याचे १२ खरेदीदार फसले नसते. शासनाने नवीन योजना आखावी किंवा कंपनीला धारेवर धरून वाहनांची रक्कम परत करावी, यासाठी सहकार्य करा, अशा मागणीचे निवेदन माजी आमदार दिलीप बंसोड यांना ई-रिक्षा चालकांनी दिले आहे. निवेदनानुसार, ई-रिक्षा डीलरने सर्व आवश्यक कागदपत्रे कंपनी तयार करून दोन महिन्यांत देणार आहे. कोणत्याही परवान्याची गरज पडणार नाही. या विश्वासावर कसेबसे रक्कम गोळा करून, कर्ज घेवून खरेदी केले. त्यावेळी गोंदिया जिल्ह्यात बंदीची जाणीव कुणालाही नव्हती, असे ई-रिक्षा चालकांनी सांगितले. तिरोडा तालुक्यात सेवकराम लोहबरे यांचा ई-रिक्षा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गोंदिया यांनी १२ आॅगस्ट २०१६ रोजी पकडून मोटार वाहन नियम १२६ ची कारवाई करून जप्त केले. त्यामुळे इतर ११ ई-रिक्षा चालकांत भीती निर्माण झाली आहे. सेवकराम लोहबरे यांनी बचत गट व इतर व्यक्तींकडून १० टक्के व्याजाने रक्कम उचलून वाहन खरेदी केल्याचे लोकमतला सांगितले. तसेच माजी आ. दिलीप बंसोड यांना निवेदन देवून आपबिती सांगत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. यावर बंसोड यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेवून वास्तविकता तपासून काही मार्ग निघू शकेल का, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी ई-रिक्षा चालक सेवकराम लोहबरे, सुशीला लोहबरे, दलपत खरोदे, हफीज शेख, महेश चौधरी, पवन जीवतोडे, मोसीन खान, अमोल राऊत, संजय ढोरमारे, मजीत शेख, अमित अमृते, नरेश बरियेकर उपस्थित होते.(वार्ताहर)