शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

शौचालयाविना बस धावणार नाही; गोंदिया जिल्ह्यातील हिरापूर आगारप्रमुखाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 13:34 IST

बसस्थानकावर शौचालय नसल्याने झालेल्या गैरसोयीचा निषेध करण्यासाठी हिरापूर बसस्थानकाच्या आगारप्रमुखाने मंगळवारी सकाळी निघणारी बस रोखून एक वेगळे आंदोलन पुकारले आहे.

ठळक मुद्देशालेय विद्यार्थ्यांना व प्रवाशांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: बसस्थानकावर शौचालय नसल्याने झालेल्या गैरसोयीचा निषेध करण्यासाठी हिरापूर बसस्थानकाच्या आगारप्रमुखाने मंगळवारी सकाळी निघणारी बस रोखून एक वेगळे आंदोलन पुकारले आहे. गोंदिया ते हिरापूर अशी बसफेरी येथे रात्री पोहचते. रात्रभर मुक्काम करून ही बस पहाटे ६.३० वा. गोंदियाकडे पुन्हा रवाना होते. या बसच्या चालक व वाहकाला निवासाकरिता ग्रामपंचायतीत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र तेथील शौचालयाला लावलेले कुलूप वारंवार सांगूनही काढण्यात आले नाही. सकाळी या दोन कर्मचाऱ्यांना शौचविधीसाठी उघड्यावर जावे लागत आहे. वारंवार कुलूप काढण्याची मागणी फेटाळली गेल्यामुळे आगारप्रमुखाने मंगळवारी सकाळी बसची फेरी रद्द केली. या निर्णयामुळे जवळपासच्या परिसरातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांनाही तिष्ठत रहावे लागले. शौचालयाची व्यवस्था केली जाताच ही बससेवा पूर्ववत केली जाईल असेही आगारप्रमुखांनी स्पष्ट केले आहे.ग्रामपंचायतीत असलेली शौचालयाची व्यवस्था ही चालक व वाहकांसाठी नाही. त्यांच्यासाठी १५ दिवसात व्यवस्था केली जाईल व बससेवा नियमित करण्याचा प्रयत्न केला जाईल.बबलू गौतम, उपसरपंच, हिरापूर.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक