शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी बसफेऱ्या बंद

By admin | Updated: October 5, 2016 01:28 IST

तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया हा पाच किमीचा रस्ता पूर्णत: रेती वाहतुकीमुळे खराब झाला आहे.

रस्त्यासाठी निधी द्या : कैलास पटले यांची मागणीइंदोरा बु. : तिरोडा तालुक्यातील अर्जुनी ते सावरा-पिपरीया हा पाच किमीचा रस्ता पूर्णत: रेती वाहतुकीमुळे खराब झाला आहे. या रस्त्यावरून वाहन चालणे कठीण झाले असून एसटीच्या बसफेऱ्यासुध्दा बंद करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व उत्खनन विभाग यांनी निधी उपलब्ध करून त्वरित रस्ता दुरूस्त करावी, अशी मागणी क्षेत्रातील नागरिकांसह जि.प. सदस्य कैलास पटले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. अर्जुनी टंकीटोलीपासून पिपरीया नदीघाटापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा पाच ते सहा किमीचा डांबरीकरण रस्ता चांगला होता. या रस्त्यावरून तिरोडा ते सावरा-पिपरीया एसटीच्या दिवसातून चार बसफेऱ्या व मानव विकासच्या दोन बस फेऱ्या सुरू होत्या. सदर रस्ता महाराष्ट्र ते मध्यप्रदेशच्या सीमेला वैनगंगा नदीकाठावरील पिपरीया या गावाशी जोडला आहे. त्यामुळे या भागात नागरिकांची दररोज ये-जा जास्त असून मुख्यत: अर्जुनी या गावांशी जास्त संपर्क आहे. मागील उन्हाळ्यापासून पूर्ण पावसाळ्यापर्यंत रेती कंत्राटदारांनी वैनगंगा नदी काठावरून रेतीची ओव्हरलोड वाहतूक रात्रंदिवस सुरू ठेवली. यात डांबरीकरणाचा रस्ता पूर्णत: खराब झाला व मोठमोठे खड्डे पडले. या संदर्भात मागील दोन महिन्यांपूर्वी संबंधित विभागाला व जिल्हाधिकारीऱ्यांना पत्राद्वारे रस्ता दुरूस्ती व रेती वाहतूक बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु याकडे सदर विभागाने मुळीच लक्ष दिले नाही. आज या रस्त्यावरील सर्व वाहतूक म्हणजे एसटी बसेस बंद केल्या आहेत. अर्जुनी गावाजवळील शाळेच्या समोरील व सुभाष तिडके यांच्या घरासमोरील रस्त्यावर रेती कंत्राटदारांनी रस्त्याच्या खड्ड्यांत दगड व मुरुम घातले होते. परंतु रेतीच्या ट्रकमुळे व सततच्या पावसाने तिथे आणखी मोठे खड्डे तयार झाले आहेत. त्यात अनेक दुचाकी वाहन चालक पडले व गंभीर जखमीसुध्दा झाले आहेत. अर्जुनीच्या रस्त्याच्या शेवटच्या घरापासून तर पिपरीयापर्यंतचा पूर्ण रस्ता खड्ड्यांनी चिखलांचा झाला आहे. येथून पायी चालणे कठीण झाले तर वाहन कसे चालवावे, हेच कळत नाही. रेतीघाटामुळे शासनाला लाखोचा निधी मिळाला. परंतु येथील नागरिकांचे बेहाल झाले आहेत. लोकांना चिखलातून मार्ग शोधावे लागत आहे. विद्यार्थी व नागरिकांची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी सदर गावांना भेट देऊन येथील समस्या जाणून घ्यावी व अर्जुनी ते पिपरीया हा रस्ता दुरूस्तीसाठी त्वरित निधी उपलब्ध करून रस्ता दुरूस्त करावे व पूर्ववत बसफेऱ्या व वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी जि.प. सदस्य व सरपंच अर्जुनी, सावरा, पिपरीया यांनी केली आहे. (वार्ताहर)