शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

मिनी मंत्रालयात पदाधिकाऱ्यांच्या हातात झाडू

By admin | Updated: October 3, 2015 01:36 IST

जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशनद्वारे २५ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबरदरम्यान राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छता ...

जि.प.त स्वच्छता मोहीम : श्रमदानातून केली कार्यालय व परिसराची स्वच्छतागोंदिया : जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशनद्वारे २५ सप्टेंबर ते ११ आॅक्टोबरदरम्यान राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानात शुक्रवारी अनोखा उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या चार मजली इमारतीसह विस्तीर्ण आवारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात स्वत: पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी हातात झाडू पकडून परिसराची स्वच्छता केली.या स्वच्छता मोहीमेत जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे, सभापती पी.जी.कटरे, विमल नागपुरे यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) आर.एल. पुराम, पाणी व स्वच्छता विभागाचे राजेश देशमुख तसेच जिल्हा कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, कार्यकारी अभियंता (ल.पा.) यांच्यासह सर्व विभागप्रमुख सहभागी झाले.सुरुवातीला महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री व जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून अध्यक्ष उषाताई यांनी उपस्थित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर सर्वांनी जिल्हा परिषदेचा परिसर स्वच्छ केला. तसेच सर्व विभागांच्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयाची अंतर्गत साफसफाई केली.या स्वच्छता अभियानाची प्रेरणा घेऊन महिन्यातून एकदा अशी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे उषाताई मेंढे यांनी यावेळी सांगितले. उपाध्यक्ष गहाने यांनी अशी मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येईल, तसेच जि.प. परिसरात असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करून कार्यालयाची नियमित स्वच्छता करण्यात यावी, असे सूचविले.सदर स्वच्छता मोहिमेकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधीक्षक गौतम, कार्यक्रम व्यवस्थापक येरपुडे यांच्यासह दिशा मेश्राम, रहमतकर, राजेश उखळकर, अतुल गजभिये, देवानंद बोपचे, मुकेश त्रिपाठी, भागचंद रहांगडाले, पदलमवार, बाळकृष्ण पटले, तृप्ती साकुरे, विशाल मेश्राम, शोभा फटिंग, छाया सहारे, सचिन रोडी, रमेश उदयपुरे आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)