शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

चिमुकल्यांच्या खांद्यावरचे ओझे होणार कमी... शाळेत एकच पुस्तक न्यावे लागणार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:23 IST

शिक्षण विभागाने एकात्मिक व द्विभाषिक पुस्तक हा प्रयोग अंमलात आणला आहे. इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा प्रयोग राज्यात प्रथमच राबविला जात आहे.

ठळक मुद्देप्राथमिक विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पुस्तकशिक्षण विभागाचा उपक्रम जिल्ह्यातून अर्जुनी-मोरगाव तालुक्याची निवड

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी व्हावे तसेच वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांच्या गुंतागुतीतून विद्यार्थ्यांची सुटका व्हावी या दृष्टीकोनातून शिक्षण विभागाने एकात्मिक व द्विभाषिक पुस्तक हा प्रयोग अंमलात आणला आहे. इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा प्रयोग राज्यात प्रथमच राबविला जात असून यांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून एका तालुक्याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार, गोंदिया जिल्ह्यातून अर्जुनी-मोरगाव तालुक्याची निवड करण्यात आली असून तालुक्यातील विद्यार्थ्यांना या एकात्मिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे.

आजच्या शिक्षण पद्धतीत पहिलीतील विद्यार्थ्यांनाही विविध विषयांच्या पुस्तकांचा वापर करावा लागत आहे. विविध विषयांच्या पुस्तका तसेच त्या विषयांच्या वह्या घेत विद्यार्थ्यांच्या दप्तर वजनी होते. चिमुकल्या विद्यार्थ्यांना ते आपल्या खांद्यावर लादून शाळेत ये-जा करावी लागते. शिवाय वाढत्या वर्गानुसार वह्या पुस्तकांची संख्या वाढत जाते व परिणामी दप्तराचे ओझे वाढत असल्याचे दिसतही आहे. याशिवाय, वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांच्या गुंतागुंतीत कित्येकदा विद्यार्थी पुस्तक शाळेत घेऊन जाणे विसरूनही जातात. अशात त्या दिवसाचा अभ्यासही मागे राहतो.अशात इयत्ता १ ते ७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांची पुस्तकांची ही गुंतागुंत संपुष्टात यावी तसेच त्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी व्हावे या दृष्टीने राज्याच्या शिक्षण विभागाने यंदा राज्यात एकात्मिक व द्विभाषिक पुस्तक हा प्रयोग राबविला आहे. यंदाचे हे पहिलेच वर्ष असल्याने सध्यातरी प्रत्येक जिल्ह्यातून एका तालुक्याची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार, गोंदिया जिल्ह्यातून अर्जुनी-मोरगाव तालुक्याची निवड करण्यात आली असून विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शिक्षण विभागाने हाती घेतलेला हा प्रयोग स्तुत्य असून यामुळे विद्यार्थ्यांची नक्कीच दप्तराच्या ओझ्यापासून सुटका होणार असल्याचे दिसत आहे.यंदाचा पायलट प्रोजेक्टराज्याच्या शिक्षण विभागाने यंदा अंमलात आणलेला एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकाचा प्रयोग पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविला जात आहे. यावर्षी या प्रोजेक्ट अंतर्गत विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा अभिप्राय नोंदविला जाणार आहे. तसेच त्या आधारावर भविष्यात फक्त एका तालुक्यापुरते नव्हे तर अवघ्या राज्यातच हा प्रयोग अंमलात आणायचा काय हे ठरविले जाणार आहे. म्हणजेच, यावर्षी तरी हा प्रयोग फक्त जिल्ह्यातील एका तालुक्यापुरताच मर्यादित असल्याचे वाटत असले तरिही यंदाचा प्रतिसाद बघून पुढील वर्षी चिमुकल्यांची दप्तराच्या ओझ्यातून सुटका होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

७४ हजार ८५० विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपअर्जुनी-मोरगाव तालुक्यात यंदा इयत्ता १ ते ७ पर्यंत ७४ हजार ८५० विद्यार्थ्यांची नोंद असून त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी केली होती. शिक्षण विभागाला मागणीनुसार पुस्तकांचा पुरवठा करण्यात आला असून या विद्यार्थ्यांना एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये ३ महिन्यांसाठी १ पुस्तक अशाप्रकारे एकूण ३ पुस्तकाचे वितरण करण्यात आले आहे. तिमाही, सहामाही व वार्षीक अशा हा संच असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करता यावे यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. त्यानुसार अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७४ हजार ८५० विद्यार्थ्यांना एकात्मिक व द्विभाषिक पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे.-राजकुमार हिवारेशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, गोंदिया

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र