लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्लास्टिक बंदीचा विषय आता गंभीर झाला असून राज्यात सर्वत्र प्लास्टिक व्यवसायिकांवर धाडी टाकल्या जात आहेत. या अंतर्गत गोंदिया नगर परिषदेने सोमवारी (दि.२५) शहरातील चार प्लास्टिक व्यवसायीकांना दणका देत त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. कारवाईमुळे व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.शनिवारपासून (दि.२३) राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. यावर आता काहीच तोडगा निघणार नसल्याने नगर परिषदेने प्लास्टिक व्यवसायिकांवर कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार, गोंदिया नगर परिषदेनेही कारवाईचा श्री गणेश करीत सोमवारी (दि.२६) शहरातील मुख्य बाजारातील असाटी प्लास्टिक, चौरसीया प्लास्टिक, श्याम मंगलम प्लास्टिक व ओम साई प्लास्टिक या चार दुकानांवर धाड घालून त्यांना प्रत्येकी पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या आदेशावरून प्रशासनीक अधिकारी सी.ए.राणे यांच्या नेतृत्वात स्वच्छता विभागाचे अभियंता सचिन मेश्राम, आरोग्य निरीक्षक मुकेश शेंद्रे, प्रफुल पानतवने, कर्मचारी सुमित शेंडे, प्रवीण गडे, शिव हुकरे, संजय रहांगडाले यांनीही कारवाई केली. यापूर्वीही नगर परिषदेने शहरातील ३२ प्लास्टिक व्यवसायिकांना नोटीस बजावल्याची माहिती आहे.
चार प्लास्टिक व्यवसायिकांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:21 IST
प्लास्टिक बंदीचा विषय आता गंभीर झाला असून राज्यात सर्वत्र प्लास्टिक व्यवसायिकांवर धाडी टाकल्या जात आहेत. या अंतर्गत गोंदिया नगर परिषदेने सोमवारी (दि.२५) शहरातील चार प्लास्टिक व्यवसायीकांना दणका देत त्यांच्याकडून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. कारवाईमुळे व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
चार प्लास्टिक व्यवसायिकांना दणका
ठळक मुद्देनगर परिषदेची कारवाई : २० हजारांचा दंड केला वसूल