शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेज रोडवर चालणार बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 21:38 IST

कुडवा नाका ते नमाद महाविद्यालयासमोरील नाल्यापर्यंतची मोजणी करण्यात आल्यानंतर आता नगर परिषदेने कुडवा नाका येथे होर्डिंग लावून अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची सूचना दिली आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण हटाओ मोहीम : २६ तारखेला कारवाईची माहिती

ऑनलाईन लोकमतगोंदिया : कुडवा नाका ते नमाद महाविद्यालयासमोरील नाल्यापर्यंतची मोजणी करण्यात आल्यानंतर आता नगर परिषदेने कुडवा नाका येथे होर्डिंग लावून अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याची सूचना दिली आहे. येत्या २६ तारखेला येथील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कॉलेज रोडवर बुलडोजर चालणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.शहरातील अतिक्रमणाचा विषय गंभीर बनला असून हे अतिक्रमण काढण्यात यावे अशी शहरवासी व प्रशासनाचीही इच्छा आहे. यामुळेच मध्यंतरी अतिक्रमणाचा हा विषय चांगलाच गाजला होता. आता अतिक्रमण काढायचेच असा मानस घेऊन नगर परिषद, भूमी अभिलेख व तहसील कार्यालयाकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली होती. तसेच यांतर्गत कुडवा नाका ते नमाद महाविद्यालय रस्त्यावरील अतिक्रमणाची तिन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करून भूमी अभिलेख विभागाला मोजणीसाठी सांगण्यात आले होते.सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या पाहणीनंतर माशी कोठे शिंकली काही कळलेच नाही. मात्र आता दोन दिवसांपूर्वी अचानकच कुडवा नाका परिसरात नगर परिषदेचे होर्डींग झळकले. या होर्डींगमधून कुडवा नाका ते नमाद महाविद्यालयासमोरील नाल्यापर्यंत ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना ते अतिक्रमण २६ तारखेपर्यंत काढण्याची सूचना देण्यात आली आहे. तर २६ तारखेला कॉलेज रोड म्हणून ओळखल्या जाणाºया या रस्त्यावर बुलडोजर चालणार असल्याचीही माहिती आहे.त्यामुळे पेंडींग असलेला अतिक्रमणचा विषय आता पुन्हा हाती घेण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात आले. तसेच मनोहर चौकातील पोलीस क्वार्टरच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेले होते.मात्र तेथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आढळल्याने आता त्या जागेचा पंचनामा व पुन्हा मोजणी करून हे अतिक्रमणही काढले जाणार आहे. त्यामुळे अतिक्रमणाचा हा विषय तिन्ही विभागांकडून हाती घेण्यात आल्याचे दिसत आहे.मार्किंग अभावी मोहीम अडकूनसध्या शहरातील मुख्य मार्गांवरील अतिक्रमण काढण्याचे नगर परिषद, भूमी अभिलेख व तहसील कार्यालयाकडून ठरविण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गांवरील किती अतिक्रमण आहे व किती काढावे लागणार आहे यासाठी मार्किंग करून देण्यास भूमी अभिलेख विभागाकडे सांगण्यात आले आहे. भूमी अभिलेख विभागाकडून या रस्त्यांची मार्कींग करून दिल्यावर लगेच मोहिम राबविली जाणार असल्याचे नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सांगितले. मात्र मार्किंगचे कामच रेंगाळत असल्यामुळे मोहिमेसाठी मुहूर्त काही मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.