शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

इळदा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ठरतेय शो पीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:19 IST

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इळदा या गावाची अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आदिवासीबहुल म्हणून शासन दप्तरी नोंद आहे. या गावासह परिसरातील नागरिकांच्या ...

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील इळदा या गावाची अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आदिवासीबहुल म्हणून शासन दप्तरी नोंद आहे. या गावासह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी शासनाचे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून दोन वर्षांपूर्वी भव्य इमारत तयार केली; परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर कर्मचारी वर्ग नियुक्त करून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित न केल्यामुळे येथील इमारत शो पीस ठरत आहे.

इळदा येथील नागरिकांना आरोग्य सुविधेसाठी इतर ठिकाणी जावून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्यामुळे युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश नाकाडे यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा असा हनुमान चालीसा अविरत पठण आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून जिल्हा प्रशासनाला दिला आहे. इळदा गावासह परिसरातील राजोली, भरनोली, खडकी, तिरखुरी, कुणबीटोला, बलीटोला, सायगाव, तुकुम, जांभळी, धमदीटोला, अरततोंडी या नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गावातील नागरिकांना केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येवून आरोग्य सेवा घेण्याची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने सात वर्षांपूर्वी ग्राम इळदा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असलेला कर्मचाऱ्यांसह प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून भव्य इमारतीचे बांधकाम केले.

.........

दोन वर्षांपासून प्रतीक्षा कायम

आरोग्य केंद्रांची इमारत पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी लोटूनही या इमारतीचा लोकार्पण सोहळा आटोपून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नवनिर्मित इमारत शोभेची वास्तू ठरत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची काही हालचाल दिसून येत नाही. या परिसरातील गोरगरीब नागरिकांना आरोग्य उपचारासाठी इतर स्थळी जाण्याची पायपीट करावी लागत आहे. परिणामी, बाहेर जावून आरोग्य सेवा घेण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना वाटेत जीव सोडावा लागतो, तर गर्भवती महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

..........

हनुमान चालीसा पाठ करून वेधणार लक्ष

जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत तयार असतानाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यात आले नाही. या मागणीला घेऊन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश पाटील नाकाडे यांनी निवेदन देऊन येत्या पंधरा दिवसात सदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्‌घाटन करून सर्व सोई-सुविधेसह कार्यान्वित केली नाही तर जिल्हा प्रशासनाच्या विरोधात अखंड हनुमान चालीसा पठन करून उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे.