शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग क्रीडा प्रबोधिनी निर्माण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 22:36 IST

दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासठी राज्य सरकार लवकरच प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग क्रीडा प्रबोधिनी निर्माण करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवार (दि.२४) देवरी येथे केली.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरूवात

आॅनलाईन लोकमतदेवरी : दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्यासठी राज्य सरकार लवकरच प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग क्रीडा प्रबोधिनी निर्माण करणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी शनिवार (दि.२४) देवरी येथे केली.देवरी येथे दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन, अपंग कल्याण आयुक्तालय पुणे द्वारा आयोजित व कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नगर पंचायत क्रीडांगणावर राज्यस्तरीय दिव्यांग क्रीडा महोत्सव २०१८ आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्याधिकारी राजा दयानिधी, जि.प.उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली, सभापती सुनंदा बहेकार, नगराध्यक्ष सुमन बिसेन, आयुक्त अपंग कल्याण आयुक्तालय नितीन पाटील, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण सिद्धार्थ गायकवाड, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, झामसिंग येरणे उपस्थित होते.बडोले म्हणाले, भविष्यात दिव्यांगाना आधार व प्रोत्साहन मिळावे याकरिता शासन कटीबद्ध आहे. दिव्यांग बांधवांना कौशल्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देणार, क्रीडा शिक्षकांना सुधारित वेतन, मतीमंदाना आधार गृह निर्माण करुन देण्यात येईल. दिव्यांगांच्या विकासासाठी ३ टक्के निधी प्रत्येक गावाला मिळेल याची काळजी घेतली जाईल. जानकार म्हणाले, दिव्यांगाच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन करताना आनंद होत आहे.महाराष्टÑाच्या पूर्व टोकाला ग्रामीण भागात ऐवढी मोठी स्पर्धा होणे फार मोठी बाब अहे. जिल्ह्याचा व जिल्ह्याच्या प्रतिनिधींचा गौरव वाढवणारी ही स्पर्धा आहे. दुग्ध व मत्स्य विभागात दिव्यांगाना ३ टक्के आरक्षण देणार असल्याचे सांगितले. या वेळी सर्व मान्यवरांनी कृष्णा सहयोगी संस्था देवरीच्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन पाटील यांनी मांडले.सूत्र संचालन जवाहर गाढवे यांनी तर आभार झामसिंग येरणे यांनी मानले.