शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईमुळे बांधकाम व्यवसाय अडचणीत

By admin | Updated: May 15, 2014 01:28 IST

तीव्र उन्हाळ्याच्या पूर्वीच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरू असतानाच जलस्त्रोत आटल्याने बांधकाम व्यवसायही अडचणीत सापडले आहे

गोंदिया : तीव्र उन्हाळ्याच्या पूर्वीच पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरू असतानाच जलस्त्रोत आटल्याने बांधकाम व्यवसायही अडचणीत सापडले आहे. त्यामुळे या व्यवसायावर आता मंदीचे सावट पसरले आहे. उपजीविकेसाठी बांधकाम व्यवसायावर अवलंबून असणार्‍या कामगारांना मोठय़ा प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वी सिमेंट कंपन्यांच्या मनमानीमुळे सिमेंटच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात लोखंड, स्टील आणि सिमेंटच्या वाढत्या किमतीमुळे भारतीय कंपन्यांनीही दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षीसुद्धा घर व फ्लॅट्सच्या किमतीत वाढ झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी पाणी टंचाईमुळे बांधकाम व्यवसायावर परिणाम जाणवतोच. परंतु यंदा पाणी टंचाईला महागाईची जोड मिळाल्याने बांधकाम व्यवसायावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.बांधकाम व्यवसायातील या मंदीचा फटका यावरच दैनंदिन जीवन अवलंबून असलेल्या कामगारांवर बसला आहे. अनेक मजुरांना काम मिळणेही कठीण झाले आहे. बांधकाम साहित्यांच्या किमतीती सतत होणार्‍या वाढीमुळे प्लॅट्सच्या किमती १५ ते २0 टक्क्यांनी वाढल्या आहेत.शहरातील चौकाचौकात ठिय्या मांडून बसलेल्या कामगारांची उन्हाळ्याच्या दिवसात कामाअभावी मोठीच थट्टा होत आहे. जेथे प्यायलाच पाणी मिळत नाही, तेथे बांधकामासाठी पाणी कुठून पुरणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात निदान दोन महिने तरी बांधकाम बंदच ठेवावे लागते. त्यातच आता लोखंड महाग झाल्याने बांधकामावर परिणाम झाला आहे. त्यामुळे एक महिन्यापासून दररोज कामगार तासनतास कामाच्या शोधात ठिय्या मांडून असलेले आढळतात. सकाळी ८ वाजता आलेल्या मजुरांना दुपारच्या दोन वाजतापर्यंतसुद्धा काम मिळेणासे झाले आहे. त्यामुळे साफसफाई व हमाली यासारख्या कामांचा या मजुरांनी आधार घेतल्याचे दिसून येत आहे.बांधकामावर २00 ते २५0 रूपये दिवस मजुरी मिळविणारे हे कामगार आता ५0 व १00 रूपये रोजीवर समाधान मिळवायला तयार आहेत. पाण्याअभावी व इतर कारणांमुळे शहरातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या इमारतींचे बांधकाम अर्धवट अवस्थेत बंद पडले आहेत. काही कामगार तर दुपारचे २ वाजले तरी हाती काम न मिळाल्याने रिकाम्या हातानेच परततात. या प्रकाराने मजुरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. (प्रतिनिधी)