शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

नवभारताचा निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:29 IST

इंग्रजांना भारत छोडोचा नारा दिला होता. त्याच्या ५ वर्षानंतर १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तसेच देशातील कुरितींना पळवून लावण्याकरिता व नव्या भारताच्या निर्माणासाठी आज संकल्प घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्देउपेंद्र कोठेकर : जिल्हा बैठकीत माजी खासदारांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : इंग्रजांना भारत छोडोचा नारा दिला होता. त्याच्या ५ वर्षानंतर १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तसेच देशातील कुरितींना पळवून लावण्याकरिता व नव्या भारताच्या निर्माणासाठी आज संकल्प घेण्याची गरज आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवभारताच्या निमार्णासाठी ‘संकल्प से सिध्दी’ कार्यक्र म हाती घेतला असून प्रत्येक भारतीयाने हा संकल्प करून सन २०२२ पर्यंत देशाला सुजलाम सुफलाम करायचे आहे, असे प्रतिपादन भाजपचे विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांनी केले.गोरेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा बैठकीत बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. याप्रसंगी प्रामुख्याने पालकमंत्री बडोले, आ.डॉ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, जिल्हा प्रभारी सुभाष पारधी, माजी खासदार चुन्नीभाऊ ठाकूर, डॉ. खुशाल बोपचे, माजी आ. केशव मानकर, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, तिरोडाच्या नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, महिला मोर्चा प्रदेश सचिव सीता रहांगडाले, जिल्हा महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, रविकांत बोपचे, लायकराम भेंडारकर, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, जि.प.सभापती छाया दसरे, देवराज वडगाये, ओबीसी आघाडी प्रदेश सचिव विरेंद्र जायस्वाल, न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष हनुवत वट्टी, अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष अल्ताफ हमीद, अनुसूचित जाती आघाडी जिल्हाध्यक्ष रतन वासनिक, झामिसंग येरणे, रजनी नागपुरे, धनंजय तुरकर आदि उपस्थित होते.कोठेकर पुढे म्हणाले, आज सर्वत्र भाजपला जे यश मिळत आहे, ते केंद्र व राज्य सरकारचे चांगले धोरण, योजना, निर्णय यांच्यामुळे. त्याकरिता ‘आपले सरकार, चांगले सरकार’ या धोरणानुसार प्रत्येकापर्यंत सरकारचे कार्य पोहोचवावे. मागच्या कुठल्याही सरकारच्या कामाची तुलना आजच्या सरकारसोबत केल्यास ही सर्वात चांगली सरकार आहे, असे ते बोलले.प्रास्ताविकातून जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचे सांगून राबविण्यात येणाºया कार्यक्रमांची माहिती दिली. डॉॅ. परिणय फुके यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी नसून कर्जमुक्त करून शेतकºयांचा आर्थिक विकास करण्यासाठी मुख्यमंत्री कार्य करीत असल्याचे सांगून अभिनंदन प्रस्ताव मांडला. यात त्यांनी कर्जमाफीचा इतिहास व भाजपच्या ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल माहिती दिली.आमदार विजय रहांगडाले यांनी शासनाच्या योजनांची माहिती दिली व अभिनंदन प्रस्तावाचे अनुमोदन केले. रचना गहाणे यांनी प्रदेश बैठकीत झालेल्या कार्याची व ठरावाची माहिती दिली. सीता रहांगडाले यांनी, आज देशाच्या सर्व सर्वोच्च संविधानिक पदावर भाजपचे कार्यकर्ते आहेत. देशभरात भाजपचा प्रभाव वाढत असून नवीन मित्र जुळत आहेत. सुराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘संकल्प से सिध्दी’ कार्यात सर्वांना सहभागी करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी माजी खासदार चुन्नी ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. नानिकराम टेंभरे यांची आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा करण्यात आली.आॅनलाईन अर्ज भरण्यास शेतकºयांना मदत कराप्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वात आज देशाची शक्ती वाढली आहे. सरकार जिल्ह्यातील पीक परिस्थितीशी अवगत असून शेतकºयांच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ऐतिहासिक कर्जमाफी केली आहे. विरोधक सत्ता असताना काही करू शकले नाही. मात्र आता शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सामान्य शेतकºयांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांना आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता कार्यकत्र्यांनी मदत करावी. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडूण येणार असल्याने ही वेगळी निवडणूक आहे. निवडणुकीचे परिणाम भविष्यातील लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर होणार आहेत. याकरिता कार्यकर्त्यांनी ग्रापंचायतीच्या निवडणुका लक्षात घेवून बुथस्तरावर मजबुतीने कार्य करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.