शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीवर पूल तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:10 IST

लगतच्या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीवर पूल तयार करण्यात यावे. या मागणीसाठी येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची ....

ठळक मुद्देभाजपची मागणी : मुख्यमंत्री चव्हाण यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लगतच्या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरील वैनगंगा नदीवर पूल तयार करण्यात यावे. या मागणीसाठी येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची ते गोंदिया येघे आले असता बुधवारी (दि.१५) त्यांची भेट घेवून निवेदन दिले.मुख्यमंत्री चव्हाण गोंदियात आले असता भाजप पदाधिकाºयांनी माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या नेतृत्वात त्यांनी बिरसी विमानतळ येथे भेट घेतली.या भेटीत अग्रवाल यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यांतर्गत येत असलेल्या वारासिवनी तालुक्यात नदी काठावर असलेल्या ग्राम साखडी व बेनी तसेच महाराष्ट्र राज्यातील गोंदिया तालुत्यांतर्गत असलेल्या ग्राम डांर्गोली या मार्गावर रस्ते वाहतूक सुरू करण्यासाठी वैनगंगा नदीवर पूल तयार करण्याची मंजूरी द्यावी अशी मागणी केली.अग्रवाल यांनी, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील या गावांत व्यापार होत असून वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे लोकांना वारासिवनी येथे जावे लागते. त्यामुळे सुमारे ६५ किमीचे अंतर फिरुन यावे लागते. अशात या गावांना जोडण्यासाठी वैनगंगा नदीवर पूल तयार केल्यास दोन्ही राज्यातील लोकांना याचा फायदा होण्यार असल्याचे सांगितले. यावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी, दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून या यावर त्वरीत तोडगा काढण्याचे निर्देश दिले.सारस संरक्षणासाठी विशेष योजनेची मागणीया भेटीत अग्रवाल यांच्यासह अन्य पदाधिकाºयांनी गोंदिया व बालाघाट या दोन्ही जिल्ह्यांना लाभलेल्या दुर्मिळ सारस पक्ष्याचा विषय मांडला. अग्रवाल यांनी शांतीचा प्रतीक म्हणून ओळख असलेल्या सारस पक्ष्याच्या संरक्षणासाठी विशेष योजना राबविण्याची मागणी केली. सारस पक्ष्याला बघण्यासाठी पक्षी प्रेमी येत असतात. त्यामुळे पर्यटनाला वाव मिळावा तसेच ग्रामीणांना सारस संरक्षणासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी विशेष योजना राबविण्याची मागणी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याकडे केली.