शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

बीएसएनएल कर्मचारी संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 10:11 PM

भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) मधील सर्वच कर्मचारी संपावर गेले असून सोमवारपासून (दि.१८) पुढील ३ दिवसांचा हा देशव्यापी संप राहणार आहे. यामुळे संपाच्या या तीन दिवसांत बीएसएनएलचे कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देदेशव्यापी संप : तीन दिवस राहणार कामकाज ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारत संचार निगम लिमीटेड (बीएसएनएल) मधील सर्वच कर्मचारी संपावर गेले असून सोमवारपासून (दि.१८) पुढील ३ दिवसांचा हा देशव्यापी संप राहणार आहे. यामुळे संपाच्या या तीन दिवसांत बीएसएनएलचे कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार असल्याची माहिती आहे.आॅल इंडिया कर्मचारी संयुक्त मोर्चाच्यावतीने सोमवारपासून (दि.१८) बुधवारपर्यंत (दि.२०) ३ दिवसांचा हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. संचार मंत्र्यांनी दिलेल्या वेतनवाढीच्या आश्वासनाची पूर्तता करावी, ४-जी स्पेक्ट्रम देण्याचे आश्वासन दिले मात्र त्याची पूर्तता न केल्यामुळे बीएसएनएल ४-जी सेवा देऊ शकत नाही. करिता ४-जी स्पेक्ट्रम देण्यात यावे, कर्ज घेण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी, इलेक्ट्रीक बील भरण्यासाठी निधी देण्यात यासह अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.विशेष म्हणजे, खासगी कंपन्यांना पुढे करण्यासाठी बीएसएनएलची फिक्सींग केली जात असल्याचेही क र्मचारी बोलत आहेत. या देशव्यापी संपामुळे मात्र बीएसएनएलचे संपूर्ण कामकाज पुढील ३ दिवस ठप्प राहणार आहे.संपांतर्गत कर्मचाऱ्यांनी शहरातील सुभाष बागेच्या शेजारी असलेल्या कार्यालयात ठिय्या देत नारेबाजी करून सरकारचा निषेध व्यक्त केला. याप्रसंगी विलास बांते, आर.डी.तेलंग, आर.वाय.भांडारकर, प्रदीप ठवरे, एम.एफ.बिसेन, पी.के.मरसकोल्हे, पी.के. माहुले, जे.के.रामटेके, एफ.जी. फुंडे, आर.डी. यादव, मानकर, शालीकराम भेलावे, एम.आर.बनोटे, रज्जू खान, मधू हरपाल, जे.के. मकवाना, के.बी.गोरखे, जी.डी. विंचूरकर, बी.जी.टेंभरे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.केबल तुटल्यामुळे इंटरनेट सेवा विस्कळीतबीेएसएनएल कर्मचाºयांचे आंदोलन सुरू असतानाच इंटरनेट केबल तुटल्याने शहरातील इंटरनेट सेवा बंद पडली होती. मात्र कर्मचारी केबलची दुरूस्ती करणार असल्याची माहिती होती. मात्र अवघा दिवस इंटरनेट बंद असल्याने सर्वच व्यवहार विस्कळीत झाले होते. त्यात ३ दिवसांचा संप असल्याने व यामधात इंटरनेट सेवा सुरू न झाल्यास नागरिकांची मात्र चांगलीच फसगत होणार यात शंका नाही.