शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल कार्यालय वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 21:31 IST

संपूर्ण जिल्हाभरात बीएसएनएल सेवा मागील महिन्यात वीज बिलाचा भरणा न केल्याने ठप्प झाली होती. त्यात सालेकसा तालुक्यातील परिस्थिती काही वेगळी नाही.

ठळक मुद्देअधिकारी-कर्मचारी नाही । १० वर्षापासून कंत्राटीच्या भरवशावर कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : संपूर्ण जिल्हाभरात बीएसएनएल सेवा मागील महिन्यात वीज बिलाचा भरणा न केल्याने ठप्प झाली होती. त्यात सालेकसा तालुक्यातील परिस्थिती काही वेगळी नाही. परंतु आमगाव व गोंदिया सारख्या ठिकाणी बीएसएनएल कार्यालयात अधिकारी-कर्मचारी असताना सालेकसा तालुका मात्र याबाबतीत अत्यंत दयनीय परिस्थितीत आहे. मागील १० ते १२ वर्षांपासून येथील टेलिफोन एक्सचेंजमध्ये एकही अधिकारी वा कर्मचाºयाची नियुक्ती झालेली नाही.तालुक्यात सालेकसा, दरेकसा, पिपरिया, नवाटोला, भजेपार, साखरीटोला अशा ठिकाणी बीएसएनएल टॉवर उपलब्ध आहेत. जे सालेकसा टेलिफोन एक्सचेंज अंतर्गत येत असून यातील सालेकसा आणि साखरीटोला सोडून इतर सर्व दुर्गम आणि अति संवेदनशील भागात आहेत. यामुळे त्या परिसरातील नागरिक मोबाईल सेवेपासून वंचित झाले आहेत. दुर्गम भागात तर इतर कुठली खाजगी सेवा सुद्धा नसल्याने त्यांना एक कॉल करण्यासाठी पायपीट करावी लागते. गावकरी व विविध संघटनांकडून सेवा पूर्ववत करण्याची मागणी कित्येकदा करण्यात आली. परंतु काहीही कार्यवाही झाली नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.ज्या ठिकाणी खाजगी सेवा उपलब्ध आहे, त्याठिकाणी नागरिक बीएसएनएल सोडून इतर खाजगी नेटवर्ककडे वळताना दिसत आहेत. दरेकसा परिसरात सेवा खोळंबली असल्याने तरु ण मंडळी इंटरनेट आणि फोन कॉल करिता बेनीडोह टेकडीवर (दरेकसा घाट) जावून मोबाईल वापरताना दिसतात. त्यामुळे गावातील तरु ण घरी आणि गावात न राहता टेकडीवर मोबाईल वापरताना दिसत असल्याचे चित्र आहे.कर्मचारी निवासस्थान जीर्णावस्थेतलाखो रु पये खर्च करून येथील टेलिफोन एक्सचेंज येथेच कर्मचाऱ्यांना निवासाची व्यवस्था म्हणून निवासस्थान तयार करण्यात आले होते. मात्र आज ते निकामी पडले असून जीर्ण होण्याच्या वाटचालीकडे आहेत. जेथे कर्मचारीच नाहीत, तेथे एवढे पैसे खर्च करून निवासस्थान कशाला तयार केलेत असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. अधिकारी, कर्मचारी, सुरक्षेसाठी शिपाही, देखभाल करण्यासाठी तांत्रिक सहायक अशी कित्येक पदे मागील १० ते १२ वर्षांपासून रिक्त पडून आहेत. एकंदर बीएसएनएल बद्दल शासन आणि प्रशासनाची अशी सावत्र वागणूक बघता भविष्यात बीएसएनएल बंद होणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल