शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षित वस्तीतील बहिणींना भाऊबीजेची भेट

By admin | Updated: November 4, 2016 01:33 IST

समाजातील दुर्लक्षित लोकवस्तीतील दुर्बलांना मदतीचा हात देण्यासाठी युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे उपक्रम राबविण्यात आला.

युवा शक्ती फाऊंडेशनचा उपक्रम : बालकांसोबत फोडले फटाके आमगाव : समाजातील दुर्लक्षित लोकवस्तीतील दुर्बलांना मदतीचा हात देण्यासाठी युवा शक्ती फाऊंडेशनतर्फे उपक्रम राबविण्यात आला. त्या वस्तीतील बहिणींना भाऊबिजेची भेट देण्यात आली. आमगाव शहराच्या या मोहल्ल्यातील शैक्षणिक मागासलेपणा तसेच घरात अठराविश्वे दारिद्र्य असतानाही शासनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही लोकवस्ती चर्चेत यावी यासाठी युवा शक्ती फाऊंडेशनचे यशवंत मानकर, राकेश शेंडे, रितेश अग्रवाल, राजीव फुंडे, ज्योती खोटेले, मंगला महारवाडे, राजेश मानकर, निखील कोसरकर, नरेंद्र कावळे, कृष्णा चुटे, किसन तिवारी, रघुनाथ भुते यांनी दिवाळी व भाऊबीजेचा उपक्रम हाती घेतला. कार्यक्रमाला अतिथी म्हणून तहसीलदार साहेबराव राठोड, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे उपस्थित होते. यावेळी तहसीलदार राठोड म्हणाले, सामाजिक भावना जोपासून आर्थिक दुर्बलांकरिता प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून पुढाकार घ्यावा, दुर्लक्षित लोक वस्तीत अशा उपक्रमांचे आयोजन केल्यास ते इतरांसाठी आदर्श ठरेल. पोलीस उपनिरीक्षक शिंदे म्हणाले, नागरिकांना दिशा देणारे उपक्रम आहे. प्रत्येक व्यक्ती स्वत:साठी जगतो परंतु इतरांसाठी जगण्याची प्रेरणा प्रत्येकाने जोपासावी. लोकवस्तीतील महिलांनी दिलेल्या आपुलकीचे हे क्षण अविस्मरणीय राहतील. यावेळी महिलांना भाऊबिजेची भेट म्हणून भेट वस्तू देण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन यशवंत मानकर यांनी केले. यावेळी बालकांसोबत फटाके फोडून सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश महारवाडे, बंटी, हरिष खरकाटे, सोनू महारवाडे, संजय खोटेले यांनी सहकार्य केले. दिवे लावून व फटाके फोडून यावेळी पदाधिकाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी )