शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कचरामुक्तीसाठी हातात घेतला झाडू

By admin | Updated: August 8, 2014 00:03 IST

रस्त्यावरसुद्धा कचऱ्याचे ढिगारे आपले स्वागत करण्यासाठी सदैव तयार असतात. शहराच्या या वैशिष्ठ्यामुळे गोंदिया शहर स्वच्छतेच्या बाबतीत बदनाम झाले आहे.

 गोंदिया : गोंदिया शहरातील कोणत्याही रस्त्याने गेलो तरी रस्त्याच्या कडेला आणि रस्त्यावरसुद्धा कचऱ्याचे ढिगारे आपले स्वागत करण्यासाठी सदैव तयार असतात. शहराच्या या वैशिष्ठ्यामुळे गोंदिया शहर स्वच्छतेच्या बाबतीत बदनाम झाले आहे. परंतू शहराची ही ओळख पुसून टाकून शहर स्वच्छ व सुंदर करण्यासोबतच नागरिकांनाही स्वच्छतेची सवय लावण्याचा चंग येथील सावजी शिक्षण संस्थेने बांधला. त्यानुसार संस्थेचे संचालक सुरेश चौरागडे यांच्या पुढाकाराने शहरात अनोख्या पद्धतीने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे.चार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या ‘गंदगी हटाओ’ अभियानात शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. शहरातील गांधी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला ठाणेदार जयराज रणवर यांच्या हस्ते माल्यार्पण करून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी अस्वच्छतेमुळे वाढणारी रोगराई, त्याचे दुष्परिणाम याचे महत्व सांगत सर्वांना स्वच्छतेचे महत्व यावेळी सांगण्यात आले. त्यानंतर संचालक सुरेश चौरागडे यांच्यासह सर्वांनी हातात झाडू आणि टोपले, फावडे घेऊन ठिकठिकाणचा कचरा साफ करण्यास सुरूवात केली. कचरा हटविण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर लावून शहरातील एकेका भागात दररोज हे अभियान राबविले जात आहे. संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि आपले मार्गदर्शक माजी आ.हरिहरभाई पटेल यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण हे अभियान सुरू केल्याचे चौरागडे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यात परिसरातील नागरिकही मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. बुधवारी माजी नगराध्यक्ष दीपक पटेल यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. नागरिकांनी यात सहभागी होऊन शहर स्वच्छ करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.