शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 00:18 IST

जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र या विशेष मोहीम कार्यक्र मांतर्गत दिव्यांग व्यक्ती हा दिव्यांग प्रमाणपत्रासून वंचित राहणार नाही.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : सामाजिक न्याय भवनात दिव्यांग प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व असलेले बालक ते वृध्दांपर्यंतचे व्यक्ती प्रमाणपत्रांपासून वंचित आहेत. आजपर्यंत अनेकदा त्यांना प्रमाणपत्र तयार करण्यासाठी त्रास सहन करावा लागला. मात्र या विशेष मोहीम कार्यक्र मांतर्गत दिव्यांग व्यक्ती हा दिव्यांग प्रमाणपत्रासून वंचित राहणार नाही. यासाठी दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्रांचे प्रमाण शून्य टक्के करण्याचा निर्धार केला आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गोंदिया येथे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र शून्य टक्के प्रमाण या विशेष मोहिमेंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना उद्घाटकीय भाषणातून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी होत्या. या वेळी आमदार गोपालदास अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प.सदस्य छाया दसरे व विजय लोणारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.बडोले म्हणाले, राज्यातील हा पहिलाच प्रयोग असावा की जेथे अपंगत्वाचे १०० टक्के प्रमाणपत्र देण्याचे काम या कार्यक्रमातून करण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळण्यास मदत होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला दिव्यांग बांधवांसाठी ३ टक्के निधी दिला आहे. त्या निधीचा योग्य वापर करणे सुरु असून निश्चितच बदल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिव्यांग प्रमाणपत्र तयार करण्याच्या यशस्वितेसाठी अनेक यंत्रणांनी चांगले सहकार्य केले आहे. दिव्यांग बांधवांना आवश्यक असलेले साहित्य देखील शिबिराच्या माध्यमातून देण्यात येत आहे. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तयार झाल्यामुळे त्यांना आता संजय गांधी निराधार योजना, अपंग शिष्यवृत्ती, रेल्वे, एस.टी. सवलत, रमाई घरकूल, अपंग विवाह अनुदान, कृत्रिम अवयव व साहित्य आदी शासकीय योजनांचा लाभ घेणे सोयीचे झाले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र तयार करण्याचा हा अभिनव यशस्वी प्रयोग आता संपूर्ण महाराष्ट्रात सुध्दा राबविण्याचा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले.या वेळी जि.प. समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे व जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी मनोगत व्यक्त करून दिव्यांग बांधवांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रूखमोडे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त देवसूदन धारगावे, डॉ.अशोक चौरसीया, डॉ.राजेंद्र जैन, माजी नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांच्यासह दिव्यांग विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक अभिजीत राऊत यांनी मांडले. संचालन जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके व आभार समाजकल्याण सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी मानले.मिशन झिरो पेंडन्सी अंतर्गत ३५०० जणांना लाभपालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून गोंदिया जिल्ह्यात प्रथमच विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र १०० टक्के वाटपाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ मार्च २०१८ दरम्यान विशेष मोहीम राबवून मिशन झीरो पेंडन्सी अंतर्गत जिल्ह्यातील एकूण ३५०० लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्धार करण्यात आला व हा अभिनव प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेcollectorजिल्हाधिकारी