शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एलईडीच्या प्रकाशात शहर चकाकणार

By admin | Updated: July 29, 2016 01:44 IST

पथदिवे बंद असल्याने शहरवासीयांना रात्रीला काळोखात वावरण्याचे दिवस आता सरणार आहेत.

तीन कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी कपिल केकत गोंदिया पथदिवे बंद असल्याने शहरवासीयांना रात्रीला काळोखात वावरण्याचे दिवस आता सरणार आहेत. कारण नगर परिषद आता शहरातील पथदिव्यांचे साधारण लाईट्स बदलून एलईडी लाईट्स लावणार आहेत. यासाठी तीन कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असून लवकरच निविदा प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असून असे झाल्यास शहर एलईडीच्या प्रकाशाने चकाकणार आहे. आजघडीला शहरातील पथदिव्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी नगर परिषदेला ३६ लाख रूपयांचे कंत्राट द्यावे लागत आहे. शिवाय शहरातील सुमारे सहा हजार पथदिव्यांसाठी नगर परिषदेला दरमहा सात लाख रूपये वीज बील भरावे लागत आहे. असे असतानाही पथदिवे बंद राहणे, नादुरूस्त होणे अशा प्रकारच्या समस्या सतत कायम राहत असून शहरवासीयांना समस्येचा सामना करावा लागतो. रात्रीला पथदिवे बंद पडल्याने शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत असतानाच शहरवासी नगर परिषदेच्या नावाने बोटं मोडतात. सध्या पथदिव्यांची देखभाल व दुरूस्ती करणाऱ्या कंत्राटदाराचे बील अडकल्याने त्यांनी काम बंद पाडण्या इतपत बाब गेली होती. परिणामी शहरातील कित्येक भागातील पथदिवे बंद पडून आहेत. यामुळे मात्र त्या भागांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकाराला कायम संपुष्टात आणून शहरवासीयांना समस्यामुक्त सेवा देण्याच्या उद्देशातून नगर परिषदेने एलईडी पथदिव्यांचा प्रयोग हाती घेतला आहे. नगरोत्थान, दलितोत्तर व वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत तीन कोटींच्या निधीतून ही योजना साकारली जाणार असून त्याला मंजूरी मिळाली आहे. आता लवकरच यासाठी निविदा प्रक्रिया केली जाणार असून येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी दिली. जनरल फंडवरील बोजा कमी होणार आजघडीला नगर परिषदेला पथदिव्यांच्या बिलापोटी दरमहा सात लाख रूपये म्हणजेच ८४ लाख रूपये वर्षाला. तसेच देखभाल व दुरूस्तीसाठी तीन लाख रूपये दरमहा म्हणजेच ३६ लाख रूपये वर्षाला खर्च करावे लागत आहेत. म्हणजेच दरवर्षी एक कोटी २० लाख रूपयांचा खर्च जनरल फंडमधून (नगर परिषदेच्या तिजोरीतून) करावा लागतो. मात्र एलईडी पथदिवे लागल्यास बीलाचा खर्च सुमारे ५० टक्के म्हणजेच ४२ लाख रूपयांवर येणार. शिवाय एलईडी लाईट्स पुरविणाऱ्या कंपनीकडून पाच वर्षांची गॅरंटी मिळणार आहे. त्यामुळे दुरूस्तीसाठी खर्च करावा लागणार नाही. परिणामी देखभाल व दुरूस्तीसाठी लागणारा ३६ लाख रूपयांचा खर्चही कमी होणार आहे. अशात नगर परिषदेच्या तिजोरीतून तेवढा खर्च कमी होणार.