शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कोरणी-काटी रस्त्यावरील पुलालाही पडले खड्डे

By admin | Updated: July 27, 2014 00:12 IST

जवळच असलेल्या कोरणी-काटी रस्त्यावरील ५ कोटी रुपये खर्च करून भाद्याटोला गावाला जोडणारा पूल तयार करण्यात आला. या पुलाचे लोकार्पण गेल्या १२ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ

गोंदिया : जवळच असलेल्या कोरणी-काटी रस्त्यावरील ५ कोटी रुपये खर्च करून भाद्याटोला गावाला जोडणारा पूल तयार करण्यात आला. या पुलाचे लोकार्पण गेल्या १२ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. परंतू या पुलाच्या काठालाही खड्डे पडत सून तो भाग खचून जात आहे. त्यामुळे या पुलाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या कामाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.या पुलाच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. माती खचून वाहून गेली आहे. नागरिकांच्या सुविधेकरिता तयार केलेला हा पूल आता नागरिकांसाठी धोकादायक झाला आहे. ही बाब काही सूज्ञ नागरिकांच्या लक्षात आली. उद्घाटनाच्या आठ दिवसानंतरच सदर पुलाच्या दोन्ही बाजूंची माती वाहून गेल्याने पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पुलावरील दोन्ही बाजूकडील रस्ता पाण्यात वाहून जाण्याची दाट शक्यता असल्याने ग्रामस्थांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. या पुलाच्या बांधकामात अधिकारी-लोकप्रतिनिधींनी संगनमत केल्याचा व हे काम निकृष्ट झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केली. यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरत आहे.