शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोर मुख्याध्यापक अडकला जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 21:53 IST

अर्जित रजेच्या थकबाकीचे बिल काढून देण्यासाठी कमिशन म्हणून तीन हजार रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारताना प्रभारी मुख्याध्यापक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.

ठळक मुद्देतीन हजारांची लाच घेणे भोवले : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अर्जित रजेच्या थकबाकीचे बिल काढून देण्यासाठी कमिशन म्हणून तीन हजार रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारताना प्रभारी मुख्याध्यापक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई शनिवारी (दि.२३) रोजी सकाळी तालुक्यातील नवेगाव-धापेवाडा येथील मातोश्री मिराबाई अनुदानित आश्रमशाळेत करण्यात आली. संतोष नत्थूलाल कटरे (३३) असे लाचेची मागणी करणाºया सहायक शिक्षक व प्रभारी मुख्याध्यापकाचे (माध्यमिक) नाव आहे.प्राप्त माहितीनुसार तक्रारदार मातोश्री मिराबाई आश्रमशाळेत सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. सन २०१६-१७ मध्ये मंजूर ३० दिवसांची अर्जित रजा त्यांनी १४ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत उपभोगली. यासाठी त्यांचे या कालवाधीचे वेतन थांबविण्यात आले होते. मात्र त्यानंतर या कालावधीचे वेतन त्यांना आॅक्टोबर महिन्यात मिळाले. २० डिसेंबर रोजी तक्रारदार आश्रमशाळेत कर्तव्यावर असताना प्रभारी मुख्याध्यापक कटरे याने रजेचे बिल काढून दिले यासाठी १० टक्के म्हणजेच तीन हजार रूपये देण्याची मागणी केली. यावर मात्र तक्रारदाराने गुरूवारी (दि.२१) लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. तक्रारीच्या आधारे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि.२३) सकाळी आश्रमशाळेत सापळा लावला. यात प्रभारी मुख्याध्यापक कटरे पंचांसमक्ष तीन हजार रूपयांची मागणी करून रक्कम स्वीकारताना रंगेहात अडकला. दवनीवाडा पोलिसांत कटरे विरूद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७,१३ (१),(ड) सहकलम १३(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.